शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

शिरपूर तालुक्यातील उपाययोजनांची पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:34 IST

जिल्हाधिकारी । सतर्क राहण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शनिवारी शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील संस्थात्मक विलगिकरण कक्ष, कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि नगरपालिकेला भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेतला़ तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर भेट देवून तेथील बंदोबस्ताचीही पाहाणी केली़यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. शेजारील मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातही कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत सीमेवरील गस्त वाढवावी. आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तालुक्याचा काही भाग आदिवासी बहुल व डोंगराळ आहे. या भागात पुरवठा विभागाने विहित कालावधीत अन्नधान्याचा पुरवठा करावा. कोणीही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळत घरीच थांबावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे़ त्यामुळे नागरीकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे़ प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे़ लक्षणे दिसताच रुग्णालयात तपासणी करावी़ विनाकारण बाहेर पडू नये़ गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे