शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून हद्दवाढीच्या गावांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 21:06 IST

धुळे : शहरानजीक असलेल्या अकरा गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर हद्दवाढीतील गावांचा विकास होऊन नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याची अपेक्षा नागिरकांची ...

धुळे : शहरानजीक असलेल्या अकरा गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर हद्दवाढीतील गावांचा विकास होऊन नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याची अपेक्षा नागिरकांची होती. मात्र या गावातील खराब रस्ते, वीज पुरवठा, पथदिव्यांचा अभाव, गटारी, स्वच्छतेचा अभाव, पाणी टंचाई, वार्डातील मनपा कर्मचार्‍यांची मनमानी अशा समस्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. त्यामुळे मनपाकडून हद्दवाढ गावांवर अन्याय झाला आहे. गावांच्या विकास कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी बैठकीत सांगितले.मनपात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढीतील गांवाच्या विकास कामांच्या संदर्भा शुक्रवारी नगरसेवक व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अजिज शेख, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, उपायुक्त शांताराम गोसावी, विनायक कोते, तुषार नेरकर, कैलास शिंदे, लक्ष्मण पाटील, महेंद्र परदेशी, चंद्रकांत उगले, भटू चौधरी, छोटू चौधरी, शिरीष सोनवणे, बापू खैरनार, दिनेश पाटील, ज्ञानेश्‍वर मराठे, जगदिश चव्हाण, ऋषी ठाकरे, खंडू पाटील , चुनिलाल पाटील, प्रा. विजय देसले, विजय वाघ आणि दहा गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मनपाकडून ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, हा निधी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून गावांचा विकास कामे केली जाणार तसेच या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी दिले.अवधान व पिंप्री गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डेडरगाव तलावावरुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना दिल्यात.७६ कर्मचारी समावेश कराहद्दवाढ गावातील ग्राम पंचायतीचे तत्कालिन ७६ कर्मचाऱ्यांचे मनपात समावेश करून त्यांचे थकीत वेतनाचा प्रश्न सोडवावा. वडीलोपार्जित जागांवर ८ अ चा उतारा मिळणे, मालमत्तांची सिटी सर्व्हेमध्ये नाव नोंदणी करणे ही कामे मनपाकडून करण्यात यावी अशी मागणी बापू खैरनार, ऋषी ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Dhuleधुळे