शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

धुळे तालुक्यात चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:39 IST

जि.प.च्या कृषी विभागाचा उपक्रम : कावठी येथे झाला कार्यक्रम

ठळक मुद्देचारा प्रक्रिया प्रात्याक्षिकासाठी जिल्ह्यातील १६ गावांची निवडचारा टंचाईवर मात करण्याचा प्रयत्नपशुपालकांना दिली जाते आहे माहिती

आॅनलाइन लोकमतधुळे : चारा प्रक्रिया प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक तालुक्यातील चार या प्रमाणे १६ गावांची निवड करण्यात आली आहेत. या उपक्रमाची सुरूवात धुळे तालुक्यातील मौजे कावठी येथुन करण्यात आली.धुळे जिल्हा यावर्षी दुष्काळाचा सामना करीत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने, रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात पेरणी झाली नाही. त्यामुळे पशुधनास चारा पुरविण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यावर मात करण्यासाठी पर्यायाने उपलब्ध चाऱ्यावर प्रक्रिया करून त्यास सकस करण्यासाठी प्रात्याक्षिकांचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हाती घेतला आहे.या चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकाचा शुभारंभ १२ रोजी मौजे कावठी येथे प्रगतीशील शेतकरी मच्छिंद्र पाटील यांच्या शेतात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी धुळे पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे, पंचायत समिती सदस्य संजय शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी रोहन भोसले उपस्थित होते.यावेळी प्रात्याक्षिकांचे उद्देश पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेशकुमार चौधरी यांनी स्पष्ट केला. प्रल्हाद सोनवणे यांनी प्रात्याक्षिक मालिकांचे नियोजन, गरज, फायदे व महत्व शेतकºयांना पटवून सांगितले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील चारही पंचायत समितीचे कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच कावठी गावातील शेतकरी रामकृष्ण पाटील, देवीदास नेरकर, संजय पाटील, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, चव्हाण, मस्के आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रात्याक्षिक प्रक्रियेसाठी १६ गावांची निवड झालेली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे