शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी लगबग वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:50 IST

बीटी कपाशीला प्राधान्य : बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात

धुळे : जिल्ह्यात एकीकडे टंचाई तीव्र झालेली असताना दुसरीकडे आगामी खरीप हंगामासाठीची लगबग वाढत चालली आहे. आवंटनानुसार प्राप्त झालेल्या बीटी बियाण्याच्या किमतीची चौकशी, खरेदीसाठी बाजारात शेतक-यांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच बीटीव्यतिरिक्त अन्य कपाशी व पिकांच्या वाणाचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याने सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कपाशीची होणारी लागवड लक्षात घेऊन यावर्षी बीटी कपाशी बियाण्यांची ११ लाख ६३ हजार पाकिटे मंजूर झालेली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवठा यापूर्वी सुरू झाला आहे. सर्वच शेतकरी एकाच वेळी लागवड करत नाही. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहेत असे मोजके शेतकरी पूर्वहंगामी लागवड (धूळपेरणी) करतात. पण बहुतांश शेतकºयांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे मागणीएवढी पाकिटे वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीटी बियाणे २५ मेपूर्वी विक्री न करण्याच्या सूचना कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपन्यांकडून पुरवठा सुरू होताच शनिवारनंतर विक्री सुरू केली आहे. रविवारी बाजारपेठ बंद असतांनाही बियाणे घेण्यास आलेल्या शेतक-यांची गर्दी दिसून आली. कपाशीखालील क्षेत्र वाढणार  यंदा जिल्ह्यात खरिप हंगामांतर्गत एकूण ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षित आहे. जोरदार व नियमित पाऊस झाल्यास ही लागवड अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी कपाशीला प्राधान्य देत असल्याने दरवर्षी त्याखालील क्षेत्रात वाढ होत असून दुष्काळामुळे आहे. यंदा दुष्काळामुळे पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण नगण्य राहील, अशी शक्यता आहे. बीटी कपाशी व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, तूर, मका आदी पिकांचे बियाणेही या महिन्याअखेरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कृषीनिविष्ठा केंद्रांवर जाऊन अपेक्षित बियाणे उपलब्धता, त्याची किंमत याबाबत चौकशी करत आहेत. काही खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पाऊस झाल्यानंतर बियाणे खरेदी करतील, असे कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी सांगितले.कृत्रिम टंचाईचा संभव या संदर्भात बाजारात कानोसा घेतला असता बीटी कपाशीत राशी-२ ला शेतकºयांकडून मागणी होते. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवण्याचा संभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने खबरदारी घेऊन संबंधित कंपन्यांना मागणीनुसार एकाचवेळी पुरवठा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व शेतकरी एकाचवेळी लागवड करत नसले तरी ते बियाणे खरेदी करून ठेवतात. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती