शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्म दरात वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:57 IST

आशेचा किरण : गत सोळा महिन्यांत मुलांपेक्षा संख्या ५८ ने जास्त; शहरात ‘नकुशी’ बनली ‘हवीशी’ 

चंद्रकांत सोनार । धुळे :  आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको? हा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पटू लागला असून, ‘नकुशी’ आता हवीहवीशी वाटू लागली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या १६ महिन्यात ५ हजार ५२२ मुलांच्या तुलनेत तर ५ हजार ५८० मुलींनी जन्म घेतला आहे़ मुलींची संख्या ५८ ने जास्त असून प्रबोधनाचा परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांत स्त्री भ्रूणहत्या हा विषय ऐरणीवर आला आहे. मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाचा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. राज्यात मुला-मुलींचे हजारामागे ८९४ असे प्रमाण असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ते सरासरी ९०० पर्यंत पोहोचले आहे.  महापालिका आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांत १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या १६ महिन्याच्या कालावधीत  ५ हजार ५२२ मुलांनी ५ हजार ५८० मुलींनी जन्म घेतली आहे़ मुलांच्या तुलनेत जन्मलेल्या मुलींची संख्या ५८ने अधिक असुन यंदाचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण ८६.०१ इतके आहे.कायद्याची भितीस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र (विनियमन व दुरुपयोगावरील प्रतिबंध) कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणे गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे हा यामागील उद्देश आहे.  स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यात मनपा आरोग्य विभागाला जरी यश मिळाले असले तरी स्त्री-भ्रूणहत्येचा डाग १०० टक्के पुसण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़अ‍ॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ अनिवार्य करावेप्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखणे मोठे आव्हान आहे. यासाठी राजस्थान, उत्तराखंडमध्ये जसे सोनोग्राफी यंत्रांना ‘अ‍ॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर राज्यात सर्व ठिकाणी ‘अ‍ॅक्टीव्ह ट्रॅकर्स’ अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे़ स्त्री-भ्रूणहत्या रोखणे हा पक्षाचा किंवा अभियानाचा उपक्रम नसून समाजाचे काम आहे. त्यासाठी लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कन्या-जन्मोत्सवाचा उपक्रम  स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्त्रीशिक्षणावर परिसंवाद, निबंध, रांगोळी स्पर्धा सामाजिक संस्थासह गणेशोत्सवात देखावे केले जातात़ मनपाच्या आरोग्य विभागाकडून देखील कन्या पूजन, कन्या सन्मान असे विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामुळे स्त्रीभु्रण हत्या थांबविण्यात यश मिळवता आले आहे़ अशी माहिती  मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार यांनी दिली़एकूण          

टॅग्स :Dhuleधुळे