शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या वाढल्या, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत  वाढ गणशोत्सवात काळजी घ्या - जिल्हाधिकारी संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच अहवालही प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच अहवालही प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. चाचण्यांचे प्रमाणं दुप्पट झाल्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान गणेशोत्सवात कोरोनाचा फैलाव होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी व कोरोनाचा प्रसार थांबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी 'लोकमत'शी बोलताना केले आहे.जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ३५५ इतकी झाली आहे. मागील काही दिवसांपासून शंभर पेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण आढळत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्या १ हजार ५५५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जुलै महिन्यापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजारापेक्षा कमी होती. मात्र आता रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे.गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. बाप्पाची आरती करतानाही मास्कचा वापर करावा तसेच शारीरिक अंतर राखावे असेही त्यांनी सांगितले.धुळे शहरात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रूग्ण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये धुळे शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. शहरातील ७३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. धुळे तालुक्यातील २२६, शिरपूर १६६, शिंदखेडा २६५ व साक्री तालुक्यातील १६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पत्रकारांनीही चाचणी होणारमहापालिकेने शासनाकडे ३ हजार अँटीजेन किटची मागणी नोंदवली आहे. लवकरच अँटीजेन किट प्राप्त होणार असून शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पत्रकारांचीही चाचणी करण्याच्या सूचना महानगर पालिकेला केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून शासनाच्या नियमानुसार चाचण्या होत आहेत असेही त्यांनी सांगितले.