शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:01 IST

ढगाळ वातावरण : तुर, हरभरा, गहू काढणीवर नुकसानीचे सावट; तुर शेंगा पडल्या काळ्या...

कापडणे : मागील आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे कापडणेसह परिसरातील धनुर, लोणकुटे, धमाणे, देवभाने, सरवड, सोनगीर, तामसवाडी, हेकंळवाडी, न्याहळोद, बिलाडी या परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे व बदलत्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, दादर यासह काढणी व कापणीवर आलेल्या तूर पिकावरही नुकसानकारक वातावरणाचा दुष्परिणाम होत आहे.यंदा खरीप हंगामात पावसाने पेरणीच्या वेळेस वारंवार दडी मारल्याने सर्वत्र शेतकऱ्यांच्या पेरण्या दुबार व तिबार झालेल्या होत्या. जेमतेम पिके जगवून हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन आदी काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकेही परतीच्या व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतली व शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यातून जेमतेम शेतकरी सावरत नाही तोपर्यंत शेतकºयांच्या रब्बी हंगामातील सर्वत्र शेतीपिकांचे या दूषित व ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे.कापडणेसह परिसरात आठवडाभरापासून ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील मुख्य समजले जाणारे गहू, हरभरा व भाजीपाला पिकावर खूप मोठा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. कधी थंडी जास्तच वाढते तर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडी गायब होते. अशा या बदलत्या वातावरणामुळे परिसरातील शेतकºयांच्या रब्बी हंगामातील शेतीपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.सध्या तापमानाचा पारा हा सहा अंशांवर स्थिरावला असून थंडीचे प्रमाण अधिक असल्याने गहू व हरभºयाला हे वातावरण पोषक आहे. मात्र लगेच बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे