दोंडाईचा येथे १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा असल्याच्या पार्श्वभूमीवर तयारीसंदर्भात शुक्रवारी दादासाहेब रावल स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यावेळी माजी आमदार अनिल गोटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते एन.सी. पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, संचालक अमित पाटील, राष्ट्रवादीचे नवलसिंग गिरासे, माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, नाजिम शेख, भूपेंद्र धनगर, माजी नगरसेवक रामभाऊ माणिक, भानू पाटील, एन.डी. पाटील, राजू देशमुख, प्रा.पी.जी. पाटील, राष्ट्रवादीच्या छाया सोमवंशी, उषाताई पाटील, सत्यवती पावरा, जब्बर बागवान, दिनेश चोळके, जितेंद्र चव्हाण, छोटू सांगळे, रमेश कापुरे, ज्ञानेश्वर पाटील, वीरेंद्र गोसावी, आबा मुंडे, हर्षल पाटील, सचिन सोनवणे, गिरधारीलाल रामराखे, दिलीप पाटील, राजेंद्र बांगरे, रवी पाटील, महेंद्र पाटील, घनश्याम राजपूत, छोटू सांगळे, रमेश कापुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी. पाटील यांनी केले. अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, दहशतमुक्त अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक आपल्या समस्या मांडत आहेत. मनातील भीती संपणार नाही. तोपर्यंत माणसातील भीती कमी होणार नाही, ती भीती कमी करण्यासाठी हे अभियान सुरू आहे.
१७ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोंडाईचात येत असून ते शेतकऱ्यांशी हितगुज करणार आहेत. ८२ वर्षीय डॉ हेमंत देशमुख यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगून यापुढे रावल यांनी खोटा गुन्हा दाखल केला तर धडा शिकवेन, असा इशारा दिला.
सारंगखेडा येथील अश्व संग्रहालयाबाबत त्यांनी टीका केली. विखरण येथे जमीन क्षेत्र सारखे असूनही शेतकऱ्यांना असमान पैसे मिळाले. धर्मा पाटील यांनाही कमी पैसे मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली. वाडी शेवाडी, बह्याने येथे पण असमान पैसे मिळाल्याचा आरोप केला. मी धनगर समाजाचा असल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असाही आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. केंद्र शासनाच्या कृषी कायदे विरोधात ही त्यांनी जोरदार टीकास्त्र केले. दरम्यान १७ तारखेचा सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.