शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावल्याने मिळाला काठीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 22:41 IST

संडे अँकर । वर्दळीच्या चौकात कारवाई, बिनधास्त फिरणाऱ्यांवर बसला वचक

धुळे : गणेशोत्सवाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून कोणाला रस्त्यावरच उठ-बशाची शिक्षा तर कोणाला काठीचा प्रसाद देण्यात आला़ हे पाहून विनामास्क धारकांनी पोलिसांसमोर येण्याचे टाळत रस्ताच बदलून घेतल्याचे चित्र शनिवारी सकाळी पहावयास मिळाले़शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली़ गणेशाची मुर्ती खरेदी करण्यासाठी पारंपारीक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता काही निर्बंध पोलिसांनी लावले होते़ त्यानुसार बंदोबस्त कायम असताना विनामास्क आणि विनाकारण फिरणाºयांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर कारवाईचे सत्र अवलंबिण्यात आले़ त्यात महात्मा गांधी पुतळा चौक, शिवतिर्थ अशा ठिकाणी पोलिसांनी थांबून गर्दीवर नियंत्रण मिळविले़ जे विनामास्क फिरत होते त्यांना काठीचा प्रसाद देण्यात आला़ हे पाहून अनेकांनी आपला मार्ग बदलून घेणे पसंत केले़ शिवतिर्थ चौकात स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे थांबून होते़ अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली़ तसेच शहरातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गणपती संदर्भातील बंदोबस्त सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता़ शनिवारी सकाळी मात्र काठीचा प्रसाद अनेकांना मिळाला़ पण, ज्यांनी मास्क लावला होता ते मात्र या कारवाईतून सहिसलामत सुटले असल्याचे जाणवले़कोरोनाची पार्श्वभूमी़़कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील दक्ष राहणे गरजेचे आहे़ पण, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडत आहे़ विनामास्क फिरु नये, गर्दी टाळावी असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे़ त्याची अंमलबजावणी मात्र काही नागरिक करीत असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, गर्दी टाळा, मास्क वापरा, शक्यतोवर घराबाहेर पडू नका असे सांगण्यात येत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे