शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप व्हॅनची दुचाकीला धडक पतीचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:37 IST

चिमठाणे : दलवाडे शिवारातील घटना

शिंदखेडा ^- तालुक्यातील चिमठाणे गावालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनसमोर दुचाकीवर जाणा-या एका दांपत्यास मागाहून येणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या पत्नीवर धुळे येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी असलेल्या वंदना चौधरी या खान्देशात किर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.तालुक्यातील चिमठाणे येथील अर्जुन मोहन चौधरी हे आपली पत्नी वंदना यांच्यासह चिमठाणे दोंडाईचा रोडवर दलवाडे शिवारात असलेल्या शेतामध्ये एमएच १८ बीबी ३७९६ या दुचाकीने जात होते. त्याचवेळेस सोनगीरहुन चिमठाणेकडे येणाºया एमएच १८ एए ३८८५ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे़ सदर घटना घडल्याची माहिती चिमठाणा फाट्यावरील समाधान हॉटेलचे मालक विजय तुकाराम चौधरी यांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता या अपघातात अर्जुन चौधरी यांच्या पोटाला, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांची पत्नी वंदना चौधरी यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. दोघा जखमींना ग्रामस्थांनी चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ अर्जुन चौधरी यांना तपासले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. तर वंदना चौधरी यांना गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ अपघातप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला मयत अर्जुन चौधरी यांचा पुतण्या विजय चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयत अर्जून चौधरी यांच्या पश्चात २ मुलं व १ मुलगी आहे. मुलीचे मागील वर्षी लग्न झाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे