शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

माळमाथ्यावरील यात्रोत्सवाची शंभर वर्षाची परंपरा झाली खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:48 IST

जोगेबा यात्रेवर कोरोनाचे सावट : आगरपाडा ग्रामस्थांकडून नाराजी

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे शिवारातील माळमाथ्यावरील यात्रोत्सवाला शंभर वर्षाची परंपरा आहे़ पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या परंपरेला खंड पडला असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़साक्री तालुक्यातील व माळमाथा भागातील बळसाणे गावापासून सात ते आठ किमीच्या अंतरावरील जोगेबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते़ जोगेबा हे देवस्थान टेकडीवर असून याठिकाणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी यात्रा भरते़ परंतु शंभर वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा प्रथमच कोरोनामुळे खंडीत झाली आहे़ पोळ्याच्या निमित्ताने भरणाºया यात्रेत माळमाथा परिसरासह खान्देशभरातील शेतकरी बैलजोड्यांना सजवून जोगेबा या देवस्थानावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थितीत राहायचे़ मात्र हा पोळा उत्सव कोरोनामुळे साधेपणानेच घरी साजरा करण्यात आला़दरवर्षी पोळ्यानिमित्त गावातून सजवलेल्या सर्जाराजाची मिरवणूक ढोलताशांच्या गजराने निघायची़ जोगेबा या देवस्थानावर मोठी यात्रा भरायची़ परंतु कोरोना महामारीमुळे शंभर वर्षाची परंपरा यावर्षी खंडीत झाली़ आगरपाडा गावाच्या कुशीत बसलेल्या जोगेबा देवाचे मंदिर असून या गावात पुरातन काळापासून पोळ्याच्या दुसºया दिवशी माळमाथा भागासह जळगाव, नंदुरबार, धुळे या भागातील शेतकरी पाळीव प्राण्यांच्या नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहत असत़ त्याचबरोबर साक्री तालुक्यातील दुसाने, बळसाणे, कढरे, सतमाने, ऐचाळे, हाट्टी, इंदवे, घाणेगाव, निजामपूर, साक्री, जैताणे, फोफरे, नागपूर, वरदाने, सतारे, देवी, परसुळे आदी भागातील शेतकरी बैल जोडी, गायी, म्हैस, बकऱ्यांना रंगीबेरंगी कलरांनी व रेबीनांनी सजवून गुलालाची उधळण करीत मिरवणुकीत सहभाग होत असत़ एका दिवसाचा हा यात्रोत्सव असायचा़ याठिकाणी नवस फेडणारे भाविक बाहेरील भक्तांना प्रसाद वाटप करतात़ जोगेबा देवास्थानाची यात्रोत्सव पुरातन काळापासून सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे