शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये निराधारांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 22:07 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, ...

ठळक मुद्देकार्यालयात एक खिडकी योजनाशहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग शहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग आवश्यक कागदपत्रे आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे गरजेचे

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला होतो़ अशा अडचणीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू नये, योजनेच्या कार्यालयामार्फेत लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात अनुदानाची रक्कम दरमहिन्याला वर्ग करण्यात येत आली़ २०१९ मध्ये शासनाने घेतलेला आॅनलाईन प्रणालीचा निर्णय लॉकडाऊन काळात महत्वकांशी ठरला असे मत संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचीता चव्हाण यांनी लोकमत शी बोलतांना सांगितले़प्रश्न: शहरातील लाभार्थ्यांना किती योजनांचा लाभ दिला जातो?उत्तर: संजय गांधी योजना कार्यालया मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना योजना अशा पाच योजनांचा लाभ दिला जातो़प्रश्न: बॅकेकडे आतापर्यत किती खाते वर्ग करण्यात आले आहेत ?उत्तर: शासन योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पोस्टाच्या खात्यात वर्ग केली जात होती़ मात्र पारदर्शकपणे लाभ मिळावा़ यासाठी आॅनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार शहरातील अडीच हजार लाभार्थ्यांचे खाते बॅकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत़प्रश्न: शहरात किती लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो?उत्तर: दिव्यांग, विधवा, घटस्पोटीत, ज्येष्ठ नागरिक अशा लाभार्थ्यांना ६०० ते १ हजार रूपयापर्यंत लाभ दिला जातो़ योजना सुरू झाल्यापासून शहरात या योजनेचे ११ हजार महिला व पुरूष लाभार्थी आहेत़ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दर महिन्याला बॅकेद्वारे अनुदानाची रक्कम वर्ग केली जाते़प्रश्न: लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय प्रयत्न केलेउत्तर: सर्वसामान्य व्यक्तीपर्यत पोहचविण्यासाठी शासनाने २०१९ पासून पाचही योजना आॅनलाइन केल्या आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी कुणाची मदत घ्यावी लागत नाही़ आॅनलाईन फॉर्म भरल्यानंतर मिळालेले टोकनव्दारे कार्यालयात तपास करून निश्चित योजनेचा लाभ मिळू शकतो़महा-ई सेवा केंद्रात सुविधा उपलब्धशासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये तसेच सहरित्या लाभ मिळावा़ याहेतून आपले सरकार ई सेवा केंद्रामार्फेत लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करता येतो़ त्यानंतर चौकशी होऊन लाभ दिला जातो़कार्यालयात एक खिडकी योजनाआॅनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्यांना टोकन क्रमाकं दिला जातो़ त्याद्वारे लाभार्थी कार्यालयात येवून आपल्या अर्जाची खात्री करून शकतो़ लॉकडाऊन काळात काही प्रकरणे प्रलंबित आहेत़ त्यासाठी लाभार्थी कार्यालयात येवून पाठपुरावा करीत आहे़ लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहर तहसील कार्यालयात एक खिडकी चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़बॅक खाते गरजेचेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मध्यस्थांशी व्यवहार करण्याची गरज नाही़ आवश्यक कागदपत्रे आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे़