शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर व तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:50 IST

जिल्ह्यातही जोरदार पाऊस : नुकसानीचे वृत्त नाही

ठळक मुद्देरात्री ११ वाजेनंतर पहाटेपर्यंत संततधार पाऊसशहरातील सखल भागात पाणी साचलेकपाशी, बाजरीला फटका बसण्याची शक्यता

आॅनलाईन लोकमत धुळे : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री धुळे व शहर व तालुक्यात अतिवृष्टी झाली. तर जिल्ह्यात उर्वरीत ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. मात्र अद्याप नुकसानीचे कोठलेही अधिकृत वृत्त नाही.जिल्ह्यात पावसाळ्यात झाला नाही असा पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत आहे. जिल्ह्यात मंगळवारीही हा सिलसिला सुरू राहिला. दिवसभरात तसेच संध्याकाळनंतरही अधून-मधून पर्जन्यवृष्टी सुरू होती. परंतु रात्री ११ वाजेनंतर संततधार पाऊस सुरू झाला. तो पहाटेपर्यंत एकसारखा कोसळत होता. धुळे शहर व तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीची नोंद झाली.  परंतु नुकसानीचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.  सकाळी ८ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत  धुळे शहरात ७६ मि.मी., धुळे ग्रामीण ७१ मि.मी., साक्री  तालुका ६४ मि.मी., शिरपूर तालुका १५ मि.मी. व शिंदखेडा तालुक्यात ४२ मि.मी. अशी एका दिवसांत एकूण २६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. पिकांच्या नुकसानीची बातमी जिल्ह्यात सध्या कापूस वेचणी सुरू असून बाजरी काढण्याचेही काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. पिकांची काढणी वेळेवर होऊ न शकल्याने अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याची भीती व्यक्त होत आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असला तरी शेतकरी आधीच पिचला असून या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत भर पडणार आहे. कृउबात कांदा भिजला!शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी करून साठविलेल्या कांद्यावर पाणी गळून तो भिजल्याने त्याचे नुकसान झाल्याचे समजते. परंतु अद्याप समितीने यास दुजोरा दिलेला नाही.  अतिववृष्टीमुळे धुळे शहरातील बहुतांश सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात शाळा, कार्र्यालयांच्या मैदानांचा समावेश आहे. पांझरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.