सर्वोत्कृष्ट घरकूल पंतप्रधान आवास योजना -
प्रथम - पारगाव साहेबराव बागुल (पारगाव), द्वितीय - गुलाब भोये (जामखेल), तृतीय - वर्षा बारिस (मांजरी). सर्वोत्कृष्ट घरकूल शबरी आवास योजना- प्रथम - संगीता माळचे (कढरे), द्वितीय - गुजर गांगुर्डे (पांगण), तृतीय - सुरेश गांगुर्डे (कालटेक). उत्कृष्ट ग्रामपंचायत पंतप्रधान आवास योजना-प्रथम - मांजरी, द्वितीय - आखाडे, तृतीय - शेदवड. उत्कृष्ट ग्रामपंचायत शबरी आवास योजना- प्रथम - चिपलीपाडा, द्वितीय - शिरसोले, तृतीय - मालणगाव.
घरकूल बांधकाम करणारे अभियंते भूषण ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी, उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, गट विकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी. पंकज सूर्यवंशी, विस्ताराधिकारी भामरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.