शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

धुळ्यातील शासकीय ग्रंथालयात निधीअभावी ९ वर्षांपासून ग्रंथ खरेदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:45 IST

मराठी राज्यभाषा दिन : माय मराठीवर होतोय अन्याय, वर्ग बदल न झाल्याने ‘गाव तेथे ग्रंथालया’ला बसला आळा

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठीही येथे मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दररोज किमान ५०-६० विद्यार्थी या ठिकाणी ग्रंथाचे, पुस्तकांचे वाचन करीत असतात. यात मुलींची संख्या सर्वाधिक आहे.जिल्ह्यातील ग्रंथालयांची २०१२ पासून वर्गवारी बदलविण्यात आलेली नाही. वर्ग बदलल्यास ग्रंथालयांना मिळणाºया अनुदानात देखील फरक पडू शकणार आहे.नवीन ग्रंथालयांना मान्यता नसल्याने, शासनाच्या ‘गाव तेथे ग्रंथालय’ या संकल्पनेलाही आळा बसला आहे.

अतुल जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : भाषा संवर्धनाचे सर्वात महत्वाची भूमिका ग्रंथालये बजावित असतात. असे असले तरी ग्रंथालयांनाही ग्रंथ खरेदीसाठी निधीची चणचण भाषत असते.  धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालयात निधीअभावी गेल्या ९ वर्षात ग्रंथाची खरेदीच झालेली नाही. येथील ग्रंथसंपदेची संख्या ५४ हजारांवरच थांबलेली आहे. ग्रंथ हे आपले गुरू आहेत. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करू, तितके आपणच समृद्ध होत असतो.  धुळ्यात जिल्हा शासकीय ग्रंथालय आहे. सुरवातीला या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी निधी मिळायचा. मात्र २००९मध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी यायचा तो बंद झाला होता. त्यानंतर निधी मिळण्यासाठी जो पाठपुरावा करायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी गेल्या ९ वर्षात शासकीय ग्रंथालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधीच मिळाला नाही.  निधीअभावी या शासकीय ग्रंथालयात नवीन पुस्तकांची भरच पडलेली नाही.जिल्ह्यात २२२ वाचनालयेशासकीय ग्रंथालय अंतर्गत जिल्ह्यात २२२ वाचनालये आहेत. यात ‘अ’वर्गाचे ४, ‘ब’वर्गाचे ३४, ‘क’वर्गाचे ६३ व १२१ ग्रंथालये ही ‘ड’ वर्गात आहेत. विशेष म्हणजे या ग्रंथालयांमध्ये नियमित पुस्तकांची खरेदी होत असते. नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही२०१२ मध्ये महसूल यंत्रणेमार्फत ग्रंथालयांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळालेली नाही. ९०० वैय्यक्तीक सभासदजिल्हा शासकीय ग्रंथालयाचे  ९०० वैय्यक्तीक सभासद आहेत. त्यांच्याकडून १०० रूपये अनामत रक्कम व वर्षाला १० रूपये फी घेतली जाते. त्या मोबदल्यात त्यांना दोन पुस्तके दिली जातात. वैय्यक्तीक सभासदांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जास्त समावेश आहे.नाशिक विभागात अव्वलवैय्यक्तीक सभासदांच्या बाबतीत धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालय हे नाशिक विभागात अव्वल आहे. शासकीय ग्रंथालयामार्फत शाळा, महाविद्यालय, वाचनालय, ग्रामपंचायत यांनाही सभासद केले जाते. अशा सभासदांची संख्या ८० आहे. यांच्याकडून ५ रूपये अनामत रक्कम व १५० रूपये वार्षिक फी आकारून त्यांना ५० पुस्तके  ठराविक कालावधीत परत करायची या अटीवर दिले जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्टÑात दरवर्षी ५ हजार ग्रंथ छापले जातात. त्यापैकी किमान २ हजार  ग्रंथ खरेदी करून, वाचकांना ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे वाचकांच्या ज्ञानात भर पडते. ग्रंथ खरेदी करणे हा ग्रंथालयांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शासकीय ग्रंथालयाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे.                                               -संजय मस्के,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी