शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी बाजारात झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:11 IST

साक्री : प्रशासनाच्या आढावा बैठकीनंतर पुन्हा बाजार समिती आवारात कोरोनाचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत कायदेशीर कारवाईचे आदेश पारित व्हायला एक दिवस उलटत नाही तोच बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढयांच्या मार्केटमध्ये खरेदी- विक्री करणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळेस बहुतांश लोकांनी मास्क लावलेला नव्हते. यामुळेच साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.गेल्या एक महिन्यात साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या आसपास झाली आहे. तालुक्यातील खेडया-पाडयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क न लावणाºया लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी साक्री येथील बैठकीत दिले होते. यावेळी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच केले होते. परंतू दुसºयाच दिवशी साक्री येथील बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढयांच्या बाजारात शेकडोंच्या संख्येने खरेदी-विक्री करणारे एकत्र आले होते. यात बहुतेक लोकांच्या चेहºयावर मास्क नव्हता किंवा बाजार समितीने कोणतेही सॅनिटायझर तेथे ठेवलेले नव्हते. या गर्दीमध्ये जर कोरोना रुग्ण असेल तर त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. प्रशासनाने कितीही बैठका घेतल्या. परंतू मैदानावर त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर कोरोनाला रोखणे अशक्यच होऊन बसेल. लोकांचे कितीही प्रबोधन केले तरी त्याचा फारसा उपयोग होत असताना दिसून येत नाही. यासाठी प्रशासनाला कठोर व्हावे लागेल, तरच कोरोनाला आटोक्यात ठेवता येईल. अन्यथा तालुक्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.