शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘गण गण गणात बोते’चा दिवसभर जयघोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:41 IST

गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा : नागरिकांना भक्तीपूर्ण वातावरणाची दिवसभर अनुभूती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सोमवारी वाडीभोकर रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात  भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याने दुपारपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले़ ‘गण गण गणात बोते’ जयघोषाने भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासह प्रसादासाठी रांगा लागल्या होत्या़  श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटे पाच वाजता गजानन महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी अकरा वाजता अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्याहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले व पदाधिकारी आणि शेकडो भाविक उपस्थित होते.मंदिराच्या प्रांगणात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हापासून संरक्षणासाठी प्रांगणात मंडप टाकण्यात आलेला होता. दर्शनासाठी महिला व पुरूष यांच्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याचवेळेस मंदिराच्या आवारात विविध महिला भजनी मंडळांकडून भजनं सादर करण्यात आली़ त्यामुळे भक्तीपूर्ण वातावरण तयार झाले होते़ यानिमित्ताने मंदिरात आंब्याच्या पानांचे मंगल तोरण व झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तसेच मंदिराच्या बाहेर व आत काढण्यात आलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्रकट दिन सोहळ्यासाठी शहरातील सर्व भागातून मंदिराकडे जाणाºया भाविकांमुळे संपूर्ण वाडीभोकर रस्ता परिसरात चैतन्याचे वातावरण होते. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ भाकरी अन् पिठल्याचा भाविकांसाठी प्रसादमहाप्रसादाकरीता १० पोते बाजरीच्या भाकरी, ३ पोते डाळीचे पिठले, पाच पोते तांदळाचा मसाले भात, साडेतीन पोते साखरेची बुंदी व दोन क्विंटल हिरव्या मिरच्यांचा खुडा करण्यात आला. अकरा वाजता श्रींच्या महाआरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला़ सायंकाळी उशिरापर्यंत प्रसाद वाटप सुरु होते़ त्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.भजनांमुळे आली कार्यक्रमात रंगत!मंदिराच्या बाहेरील ओट्यावर सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.  या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ, श्री मुक्ताई भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, ता. शिंदखेडा) व श्री एकता भजनी मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी ६ वाजता चित्रकुट संस्थानचे मंगलनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. यासह दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात दिसून आली. 

टॅग्स :Dhuleधुळे