शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा इंग्रजी शाळांचे भवितव्य अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:45 IST

मंजुरीचे आदेश नाही : विद्यार्थ्यांसह पालक, कर्मचाºयांनी मांडला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने मोठा गाजा-वाजा करत सुरु केलेल्या इंग्रजी शाळा आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे प्रतिबिंब सोमवारी महापालिकेत उमटले़ इंग्रजी शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी महापौरांचे दालन गाठले़ वेतन मिळत नसल्याची कैफियत शिक्षकांनी महापौरांकडे मांडली़ त्यावर आपली बाजू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविली जाईल असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले़ महापालिकेच्या कारभारामुळे इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाºया गोरगरीबांच्या मुलांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे़ मंजुरीचा आदेश नसल्यामुळे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ इंग्रजी माध्यमांच्या ३, ९, १४, २५ या क्रमांकाच्या शाळेत इंग्रजी माध्यम शिकविले जाते़ गेल्या दोन वर्षात या इंग्रजी शाळांच्या मंजुरी आदेशाबाबत महापालिकेने कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही़ त्यामुळे कर्मचाºयांसह शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागत आहे़ त्यामुळे महादेव पदेशी आणि माजी नगरसेविका मायादेवी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांसह पालक, आणि विद्यार्थ्यांनी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे धाव घेतली़ याप्रकरणात तातडीने उच्चस्तरीय पातळीवर तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात यावा, इंग्रजी शाळांना पुर्ववत मंजुरीचे आदेश देण्यात यावे, शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी महापौरांकडे लावून धरली़ यावेळी विजय शेलार, गजेंद्र जाधव, शांताराम बोरसे, बलराम फुलपगारे, संजय चव्हाण, विजय चौधरी, विक्रम फुलपगारे आदी उपस्थित होते़ महापौरांच्या दालनाबाहेर किलबिलइंग्रजी माध्यमांची शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना पालक, शाळेचे शिक्षक, कर्मचारी हे काही राजकीय पदाधिकाºयांच्या माध्यमातून महापौरांच्या दालनात आक्रमकपणे चर्चा करत होते़ त्याचवेळेस ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील चिमुकल्यांचा महापौर दालनाबाहेर किलबिलाट सुरु होता़ हा प्रकार बहुधा पहिल्यांदाच झाला़इंग्रजी माध्यमांच्या शाळेची निर्माण झालेली समस्या समजून घेतली आहे़ हा प्रश्न डॉ़ सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविला जाईल़- चंद्रकांत सोनार, महापौर

टॅग्स :Dhuleधुळे