शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या घरासमोर दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:41 IST

भोलेबाबा नगर : क्षुल्लक कारणाचे पडसाद

धुळे : एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडजाई रोडवरील भोलेबाबा नगरात आमदार डॉ़ फारुख शहा यांच्या घरासमोर शनिवारी दुपारी घडली़ यात गुप्ती, लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपाचा सर्रासपणे वापर झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यात मजुरी काम करणाऱ्या तरुणाला दुखापत झाली़ ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन सुरुवातीला शिवीगाळ करण्यात आली़ यानंतर याचे पडसाद दोन गटात हाणामारीत उमटले़ ही घटना वडजाई रोडवरील भोलेबाबा नगरात आमदार डॉ़ फारुख शहा यांच्या घरासमोर शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़ गुप्ती, लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपाचा सर्रासपणे वापर झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ या हाणामारीत तारीक मोहम्मद हानिफ (२८, रा़ इशाक मशिदजवळ, धुळे) या मजुरीचे काम करणाºया तरुणाला डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली होती़ घटनेनंतर तातडीने जखमी झालेल्या तरुणाला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी झालेल्या या हाणामारीत तारीक मोहम्मद हानिफ याने आझादनगर पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित बबलू हंसा अन्सारी, रईस हंसा अन्सारी, शाबीर भोलू शहा, शरिफ शहा (पूर्ण नाव माहित नाही), सलमान शहा (पूर्ण नाव माहित नाही) या पाच संशयितांविरुध्द भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एऩ एम़ सहारे घटनेचा तपास करीत आहेत़ अद्याप कोणालाही अटक केलेली नाही़

टॅग्स :Dhuleधुळे