धुळे :पंतप्रधान उज्वल गॅस योजनेतुन प्रभाग कं्रमाक अकरा मधील ३२ लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वाटप भाजपा महानगरतर्फे उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले़शहरातील पारोळारोड वरील दाता सरकार मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी लाभार्थी मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेविका वंदना थोरात, नगरसेविका लक्ष्मी बागुल, वैशाली शिरसाठ, गुुड्डू अहिरराव, नगरसेवक प्रदिप कर्पे, संजय पाटील, अनिल थोरात, दिनेश बागुल, नथ्थु चौधरी, भिका चौधरी, डॉ़ रनाळकर संदीप सरग, गणेश चौधरी आदी उपस्थित होते़ कार्यक्रमात उपमहापौर कल्याणी अंपळकर म्हणाल्या की, पंतप्रधान उज्वला योजनेतुन समाजातील गरीब व गरजु नागरिकांना मोफत गॅसचा लाभ दिला जात आहे़ योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंपळकर यांनी केले़
३२ लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:08 IST