शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चार ठिकाणी तूर खरेदी केंद्र!

By admin | Updated: February 27, 2017 00:55 IST

नाफेड : धुळे, शिरपूर, नंदुरबार, शहादा येथील केंद्रांचा समावेश

धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळून चार ठिकाणी शेतकºयांसाठी तूर खरेदी केंद्र नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत़ शेतकºयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कारभारी शिंदे यांनी शेतकºयांना केलेले आहे़ दरम्यान, ही खरेदी केंद्र १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत़ केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने तूर खरेदी केंद्र नाफेडच्या वतीने धुळे शहर, शिरपूर, नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे़ या खरेदी केंद्रावर रविवारपर्यंत २४३३१़८२ क्विंटल तूर १ हजार ६७० शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेली आहे़ केंद्र शासनाने तूर खरेदीकरिता ९० दिवसांचा कालावधी निश्चित केलेला असून जिल्ह्यात तुरीची खरेदी १५ मार्च २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे़ तूर खरेदीच्या अनुषंगाने राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली होती़ बैठकीमध्ये नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, वखार महामंडळ या विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़ बैठकीत, राज्यामध्ये या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने तूर खरेदीत वाढ होत आहे़ त्यामुळे तूर खरेदीकरिता आवश्यक असणारे बारदान तसेच साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे़ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात चार ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू असून जिल्ह्यासह अन्य तालुक्यातील शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नजिकच्या खरेदी केंद्रावर आणावी़ एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असेही आवाहन शिंदे यांनी केले आहे़ या ठिकाणी होणार खरेदी वखार महामंडळ गोदाम, बाजार समिती आवार धुळे़वखार महामंडळ गोदाम, बाजार समिती आवार शिरपूऱ कृषी उत्पन्न बाजार समिती आवार नंदुरबाऱवखार महामंडळ गोदाम, बाजार समिती, शहादा़