शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकयांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यम शिक्षणाचा पाया रोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:41 IST

रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूल : सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांवर भर 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  शहरातील मिल परिसर म्हणजे कष्टकरी लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नागरिकांच्या मुलांसाठी शांतीनिकेतन बहुउद्देशीय संस्थेने २००५ साली रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूलची स्थापना केली. त्या मुलांसाठी जणू इंग्रजी माध्यमाचा पाया या शाळेने रोवला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेतर्फे विविध उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर दिला जातो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या उपजत व अंगभूत गुणांना वाव मिळावा यासाठी ही संस्था नेहमी प्रयत्नशील असते. या विविध उपक्रमांमुळे त्याबाबतचा विश्वास दृढ होतो. आपल्या संस्कृतीशी मुलांची ओळख व्हावी यासाठी आषाढी एकादशीची पायी दिंडी, गोकुळाष्टमीची दहीहंडी, रक्षाबंधन, नवरात्र, दिवाळी सणावेळी किल्ले बनविणे, गणेशोत्स, होळी तसेच ख्रिसमस अर्थात सर्वांचा आवडता नाताळ यासारखे विविध सण शाळेतच  साजरे करवून घेत त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जाते. रंगांची संकल्पना स्पष्ट व्हावी यासाठी विविध प्रकारचे कलर डे, रेड डे, ग्रीन डे, येलो डे साजरे करण्यात येतात. त्याचप्रमाणे भाजी, फळांची माहिती व्हावी यासाठी शाळेत भाज्या व फळे आठवडा साजरा होतो. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बाजारपेठ, गिरणी तसेच विविध स्थळांना विद्यार्थ्यांना नेऊन भेटी दिल्या जातात. निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे म्हणून शाळेत वृक्षारोपण,मातीचे किल्ले बनविणे असे उपक्रम राबविले जातात.  आत्मविश्वास, सभाधीटपणा हे गुण विद्यार्थ्यांत विकसित व्हावेत यासाठी दरवर्षी शाळेचे वार्षिक स्रेहसंमेलन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. विद्यार्थी व पालक सहभागी होतात. व्यक्तिमत्व विकास शिबिरातून हॉर्स रायडींग, रायफल शूटींग, डान्स, कराटे, योगा आदी उपक्रम घेतले जातात. 

टॅग्स :Dhuleधुळे