शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे जाणारी मजुरांची पाऊले थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:13 IST

संडे अँकर । मिळेल त्या वाहनांचा आधार नाहीतर पायी जावून अंतर कमी करण्याचा प्रयत्न

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी देशपातळीवर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा मजुरांना बसला आहे़ गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून त्यांची आपल्या गावाकडे, घराकडे निघालेली पायी वारी शनिवारी देखील बऱ्यापैकी महामार्गावर दिसून आली़ यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातील मजुर कुटुंब असल्याचे समोर येत आहे़पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार राज्यातून मोठ्या मजूर वर्ग महाराष्ट्रात आलेला आहे़ त्यासाठी त्यांनी नाशिक, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहराचा आधार घेऊन काम करत आपल्या आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित होते़ अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आणि सर्वच व्यवहार ठप्प करीत देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली़ परिणामी त्याची अंमलबजावणी राज्यपातळीवरुन होण्यास सुरुवात झाल्याने मोठमोठे उद्योग धंदे, फॅक्टरी बंद होऊ लागल्या़ तेथे काम करणारी मजुरांची फळी देशोधडीलाच लागली़ काम बंद झाल्याने आता पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतावू लागला़ वाहन, एसटी, रेल्वे सर्वच बंद असल्याने पायी आपल्या गावाकडे निघायचे असा चंग त्यांनी बांधला असावा, परिणामी गेल्या १० ते १५ दिवसांपासून महामार्गावर मजूर आणि त्यांची पायीवारी दिसत आहे़मुलांची होतेय आभाळमुंबई, पुणे येथून आपल्या गावाकडे निघालेल्या मजुर कुटुंबासोबत त्यांची लहान मुले देखील आहेत़ सध्या तळपळते ऊन लक्षात घेता त्यांची आभाळ होत असल्याचे दिसत आहे़ पण, त्यांचाही नाईलाज असल्याने मजुर त्यांना कधी खांद्यावर तर कधी महिला आपल्या कडेवर घेऊन अंतर कापत आहेत़ सायंकाळी उशिरा मात्र या चिमुकल्यांना काही अंतर पायी जावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़ठोस उपाययोजनेची आवश्यकतास्थानिक आणि बाहेरील राज्यातील मजूर आपल्या गावाकडे पायी जात असताना ठोस उपाययोजना प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे़ ती प्रभावीपणे होत नसल्याने नाईलाजास्तव मजुर आणि त्यांच्या कुटुंबाला पायी जाण्याची वेळ आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे