शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईत गुरे जगविण्यासाठी तुषार सिंचनावर चारा पिकांची बागायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:14 IST

शेतकयांचा खटाटोप । दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालक हैराण  पाणी, चाºयाअभावी गुरे काढली विक्रीला!

ठळक मुद्देdhule

कापडणे : पाणीटंचाईमुळे गुरांच्या चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे पशुपालक हैराण झाले आहेत. पाणीटंचाईत गुरांना जगविण्यासाठी काही शेतकºयांनी तुषार सिंचनावर चारावर्गीय पिकाची लागवड केली आहे. कापडणेसह परिसरातील न्याहळोद, कौठळ, तामसवाडी, मोहाडी, धनुर लोनकुटे, दापुरा, दापोरी, सोनगीर, सरवड, देवभाने नगाव, धमाने, बिलाडी आदी गावात सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पर्जन्यवृष्टी होत असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संकट निवारण करण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे व परतीचा पाऊसही न झाल्यामुळे सर्वत्र नदी-नाले बांध, बंदिस्त विहिरी, कूपनलिकांमध्ये ठणठणाट आहे. सध्या उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढत असल्याने विहिरींची भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. जेमतेम कमी पाणी असूनही पशुधन जिवंत ठेवण्यासाठी शेतकºयांनी नियोजन करून ठिबक व तुषार सिंचनाद्वारे अगदी थोड्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे.  शेतकरी दररोज पाणी व चारा टंचाईच्या समस्येशी सामना करताना दिसून येत आहेत.येथील सर्वत्र विहिरी कूपनलिका पाण्याविना आटल्या आहेत. सरासरी एक-दोन टक्के शेतकºयांच्या विहिरींना जेमतेम अर्धा तासपेक्षाही कमी वेळ पाण्याचा उपसा होत आहे. असे शेतकरी आपल्याकडील गुरांना जिवंत ठेवण्यासाठी मका व दादर चाºयाची पेरणी करीत आहेत. आपल्याकडील विहिरीतील कमी पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनद्वारे व तुषार सिंचनद्वारे चारा पिके जगविण्याचा खटाटोप करताना शेतकरी दिसून येत आहेत. शेतकºयांकडे साठविलेला चारा संपत आल्यामुळे जनावरांपुढे काय टाकावे, असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे