शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गरताड यात्रेत दगडफेक, पाच जखमी

By admin | Updated: February 27, 2017 00:46 IST

तमाशात गाणे लावण्याचा वाद : पोलीस बंदोबस्त तैनात, तणावपूर्ण शांतता

धुळे : तालुक्यातील गरताड गावात यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तगतराव मिरवणुकीत रविवारी रात्री  गाणे लावण्यावरून वाद झाला. यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली़ तसेच लाठ्याकाठ्यांनीही वार झाला़ त्यात  पाच ते सहा जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे़ गरताड येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी दरवर्षी यात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाही साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात लोकनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले़ होत़े त्यात कार्यक्रमापूर्वी हजेरीचा कार्यक्रम होऊन लोकनाट्यातील कलावंत व तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत एका समाजाबद्दल असलेले गाणे लावण्यात आले. ते गाणे लावण्यास काही समाजबांधवानी विरोध केला. मात्र काहींनी ते गाणे पारंपरिक असल्याने लावण्याचा आग्रह धरला. त्यानंतर गावातील काहींनी मध्यस्थी करीत वाद मिटविला़ विरोध करणाºयांना मिरवणुकीतून घरी पाठविण्यात आले़ मात्र मिरवणुकीतून घरी पाठविण्यात आलेले संबंधित काही जणांना घेऊन आले. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या होत्या. त्यांनी मिरवणुकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातून गोंधळ उडाला. तसेच दोन ेगटात तुफान दगडफेकही सुरू झाली़त्यात कौतिक तानकू भिल, रामदास रावण भिल, देवीदास दादाभाऊ भिल, शरद चंद्रसिंग भिल या चौघांसह इतरही काही जण जखमी झाले. दरम्यान गावात पथदिव्याची तोडफोडही करण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला होत़ घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ याबाबत रात्री उशिरापर्यंत मोहाडी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता़ काही जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़