शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदानगर संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 10:09 IST

आदिवासी नृत्य स्पर्धा : सुरगाणा संघाने द्वितीय तर धवलीदोंड संघाने पटकावला तृतीय क्रमांक 

पिंपळनेर : सदगुरू श्री खंडोजी महाराज यांची १९१ वी पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सव निमित्ताने सोमवार ९ सप्टेंबर रोजी येथील खंडोजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत  होळी नृत्य सादर करणाºया नर्मदानगर, तळोदा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या  संघाला २१ हजारांचे बक्षिस प्रदान करण्यात आले.  या नृत्य स्पर्धेत धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन हभप योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड.संभाजीराव पगारे, सरपंच साहेबराव देशमुख, मोहन सूर्यवंशी, तुळशीराम गावित, डॉ. जितेश चौरे, मंजुळा गावित, हभप सर्वेश्वरदास महाराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, उपनिरीक्षक लोकेश पवार, भूषण हंडोरे, प्रताप पाटील, उपसरपंच संजय जगताप, तुकाराम बहीरम, कैलास सूर्यवंशी,  सचिन धामणे, रवींद्र कोतकर, गणेश कोतकर, नितीन कोतकर, रत्नाकर बाविस्कर, उल्हास बागुल आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धुळे, नंदुरबार व गुजरात राज्यातील विविध ठिकाणांहून  आलेल्या विविध  १८ संघांनी स्पर्धेत  पारंपरिक नृत्यांनी चांगलाच रंग भरला. या  संघांनी आदिवासी नृत्यांसह वाद्य वाजवत उपस्थित हजारो श्रोत्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांना बक्षिसांसह देणगी देण्यात आली. उपस्थित नागरिकांना विविध आदिवासी नृत्यकला प्रत्यक्ष पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद लुटला.  यात नंदी नृत्य, टिपरी नृत्य, पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले यावेळी होळी नृत्य सादर करणाºया नर्मदा नगर, तळोदा संघाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना २१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक ठाकूर नृत्य सादर करणाºया सुरगाणा संघाला ११ हजार रुपये मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक डांगी नृत्य सादर करणाºया धवलीदोंड संघाला सात हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ टिपरी नृत्य भोयाचापाडा पाच हजार रुपये प्रमाणपत्र  स्मृतिचिन्ह, नंदी नृत्य जैतापूर सटाणा तीन हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, भोंगºया नृत्य, कोठबांधणी एक हजार रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महाजन यांनी केले.स्पर्धेचे काटेकोर परीक्षण    या भव्य स्पर्धेचे परीक्षण विजय खैरनार, रोहिदास कोकणी, डॉ.जी.एस. ठाकरे यांनी अत्यंत काटेकोरपणे केले. बक्षिसांचे प्रायोजक हे उपस्थित मान्यवर हे होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.मिलिंद कोतकर, देवेंद्र पाटील, योगेश कोठावदे, प्रतिक कोतकर, राजेंद्र पेंढारकर, माधव पवार, आकाश ढोले, सुभाष महाजन नितीन लोखंडे, दयाराम सोनवणे, कैलास सूर्यवंशी, प्रमोद जोशी, जितेंद्र कोतकर, हिंमत जगताप, हिरालाल शिरसाठ, ईश्वर ठाकरे, जगदीश गांगुर्डे परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे