शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

९० अंशात सायकल उभी करण्याचा देशातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:09 IST

बायसिकल डॉकिंग स्टेशन : देशात पहिल्यांदा बायसिकल डॉकिंग स्टेशन निमित्ती

ठळक मुद्देअवघ्या नऊ महिन्यातच मिळाले पेटेंटशिरपूरात पहिले स्टॅड-बायसिकल डॉकिंग सिस्टम उपकरणअनेक महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा सुरू शहराची ग्रीन सीटी म्हणून ओळख होऊ शकते़ मुंबईतील मुकेश पटेल महाविद्यालयात सादरीकरण

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चारचाकी असो अथवा दुचाकी सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था असते. मात्र सायकल कुठेही कशीही उभी करा अशी स्थिती अनेक ठिकाणी बघावयास मिळते. मात्र आता सायकलही अगदी ९० अंशाच्या जागेवरच उभी करता येणार आहे. यासाठी मूळ धुळ्याचे रहिवाशी असलेले व मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिनव प्रयोग केलेला आहे. भारतात सर्वप्रथम शिरपूर (जि.धुळे) येथे प्रायोगिकतत्वावर हा प्रयोग सुरू झालेला आहे. या उपक्रमाबद्दल त्यांना केंद्र शासनाकडून अवघ्या नऊ महिन्यातच पेटेंट मिळालेले आहे.सायकल चालवणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक तसेच शरीर, मन, चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सायकल वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे़ रस्ते अपघात, वाहतूक व शहरातील पार्किग समस्या सोडविण्यासाठी अभियात्रिकी शाखेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी मुंबईत शिक्षण घेत असतांना ‘जस्ट सायकलींग बाय शेअरींग’ हा उपक्रमाचा शोध लावण्यासाठी युरोप, वॉशिग्टन, चायना देशातील सायकल पे्रेमींची आवड, त्यासाठी लागणारा खर्च व पार्किग स्टॅण्डची व्यवस्था, रस्ते अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला. त्यानुसार भारताची लोकसंख्या व वाहतूक समस्या व जागेची उपलब्धतेचा अभ्यास केल्यानंतर कमी जागेत सायकल पार्किग करता यावी, अत्याधुनिक सायकल स्टॅड निर्मितीचे संशोधन २ वर्षात या पाच अभियंत्यांनी केले आहे़ त्यासाठी भारतातील र्स्टाटअप इंडिया कंपनीचे अ‍ॅड. दीपक मेहरा यांची मदत मिळाली आहे़असा होईल फायदा- सायकलचा प्रवास परवडणारा असला तरी सोबत सुरक्षित ठेवणे अधिक जिकरीचे असते़ त्यातच सायकल चोरीला जाण्याची शक्यता अधिक असल्याने सायकल प्रेमी सायकलीत गुंतवणूक करण्यास इच्छा दर्शवित नाहीत़ सायकल प्रेमीची इच्छा व सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात प्रवास उपलब्ध होण्यासाठी ‘जस्ट सायकलींग बाय शेअरींग’ या अंतर्गत ‘बायसिकल डॉकिंग स्टेशन ’ निमित्तीचा शोध या पाच तरूणांनी लावला आहे़मोबाईल अ‍ॅपवर माहिती- शहरातील नागरिकांना प्रवास झाल्यावर जवळच्या सायकल स्टॅण्डवर सायकल पॉर्क करतांना संबंधित व्यक्तीकडे असलेले मोबाईल अ‍ॅप, क्रेडिट कार्ड क्रॅश केल्यावर सायकल आपोआप लॉक होईल. आपण केलेला सायकलचा प्रवास, वेळ, ठिकाण व त्यासाठी लागणारे शुल्क याची माहिती आपल्या मोबाईलवर मिळेल.यांनी लावला शोध-देशातील लोकसंख्या व पार्किगची अडचण यासर्व बाबीचा अभ्यास व्यंकटेश संतोष अग्रवाल, श्रीनिकेतन संजय जोशी, मीत सजंय पगारिया, प्रसाद जगदीश राजशेखर, आदित्य कृष्णस्वरूप यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतांना केला़ देशात पहिल्यांदा बायसिकल डॉकिंग स्टेशन निमित्ती केली असे या अभियंत्यांचे म्हणणे आहे.अवघ्या नऊ महिन्यात पेंटट -र्स्टाटअप इंडियाच्या मदतीद्वारे विद्यार्थ्यांनी दोन वर्षाच्या मेहनतीनंतर बायसिकल डॉकिंग स्टेशन (सायकल स्टॅडची) निमित्ती केली आहे़ या उपकरणास भारत सरकारने नऊ महिन्यातचं मान्यता दिली आहे़ ज्या शहरामध्ये रिक्षा़, टॅक्सी, किंवा रस्त्याची समस्या आहे तसेच शाळा, महाविद्यालय, औद्यागिक, शासकीय वसाहत आहे, अशा ठिकाणी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात उपयोगात उपयोगात आणला जावू शकतो़शिरपूरात पहिले स्टॅड-बायसिकल डॉकिंग सिस्टम उपकरणाचे मुंबईतील मुकेश पटेल महाविद्यालयात सादरीकरण झाले़ त्यानंतर देशात पहिले स्टॅड शिरपूर शहरात बसविण्यात आले आहे़ तर अनेक महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा सुरू आहे़ देशात सायकलीगं उपक्रम शंभर टक्के राबविण्यास आला तर प्रत्येक शहराची ग्रीन सीटी म्हणून ओळख होऊ शकते़

टॅग्स :Dhuleधुळे