पोलीस स्टेशनमध्ये ज्या सुविधा असायला हव्यात त्यात प्रचंड प्रमाणात कमतरता दिसून येते. ठाणे अंमलदार कक्षाची ना दुरुस्ती, सीसीटीएनएस कक्ष, फर्निचर, शुद्ध पेयजल यंत्र तसेच पोलीस स्टेशन येथे कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था अशा अनेक महत्त्वाकांक्षी साधनसामग्रीची कमतरता आहे. या सुविधांसाठी संदीप बेडसे यांनी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादीतर्फेे एक लाखाची आर्थिक मदत दिली आहे. तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनची झालेली दुरवस्था व जीर्ण झालेली इमारत तसेच पोलिसांची निवासस्थाने ही पण जीर्ण आहेत. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन केले. यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार, कय्युम पठाण, रहीम मन्सुरी, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, दादाभाई कापुरे, काशिनाथ पाटील, निंबा पाटील, पिंटू खंडाळे, भोला कापुरे, शिवा खंडाळे उपस्थित होते.
दोंडाईचा पोलीस स्टेशन दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने रुपये १ लाखाची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST