एका गटाकडून दीपक धनराज साळुंके (२७, रा. शेवाळी, ता. साक्री) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील शेवाळी येथे राहणारे चेतन दशरथ भदाणे याच्याकडे दीपक साळुंके याने उसनवारीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने शिवीगाळ करण्यात आली. हाताबुक्क्याने मारहाण करीत दीपकच्या आईला चापट मारण्यात आली. जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेवाळी गावातील सरकारी दवाखान्याजवळ घडला. याप्रकरणी संशयित चेतन दशरथ भदाणे याच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या गटाकडून चेतन दशरथ भदाणे (२६, रा. शेवाळी, ता. साक्री) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्याचे पडसाद हाणामारीत झाले. जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. या झटापटीत बोटातील अंगठीही गहाळ झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेवाळी गावातील सरकारी दवाखान्याजवळ घडली. याप्रकरणी दीपक धनराज साळुंके, धनराज वेडू साळुंके, कल्पना वेडू साळुंके (सर्व रा.शेवाळी ता. साक्री) यांच्या विरोधात संशयावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.