शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’साठी अनेकांची फिल्डिंग

By admin | Updated: January 5, 2016 00:48 IST

नंदुरबार : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

नंदुरबार : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी काँग्रेस गटाने दरवर्षाला स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदी प्रत्येक घटकातील व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे ही निवड येत्या 15 दिवसांच्या आत होणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक असून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नंदुरबार पालिकेत काँग्रेसची एकतर्फी सत्ता आहे. 37 पैकी 36 नगरसेवक या पक्षाचे आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातर्फे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दरवर्षी स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सर्वच समाज घटकांमधील एका व्यक्तीला संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या तीन वर्षात 12 जणांना संधी देण्यात आली आहे. शिवाय दरवर्षी उपनगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला वर्षभरासाठी उपनगराध्यक्षपद देण्याचेही निश्चित केले आहे. त्यानुसार आतार्पयत तीन जणांना संधी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात निवड करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्य आणि उपनगराध्यक्षपदाची मुदत येत्या आठवडय़ात संपणार आहे. त्यामुळे नवीन निवडीसाठी लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांचे राजीनामापत्रदेखील घेऊन ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी स्वीकृत नगरसेवकांमध्ये रमेश पुरुषोत्तम पटेल, नरेंद्रकुमार पारसमल जैन, मोहनसिंग परदेशी व खाटीक गुलाबनबी मुसा तर उपनगराध्यक्षपदी दीपक कटारिया यांची निवड करण्यात आली होती.

प्रत्येक समाजातील एकजण

या दोन्ही पदांवर निवड करण्यात येणारे हे प्रत्येक समाजातील प्रतिनिधित्व करणारे घटक असतात. उपनगराध्यक्षपदी पहिल्या वर्षी मुस्लीम समाजाला, दुस:या वर्षी मराठा समाजाला, तिस:या वर्षी सिंधी समाजाला न्याय देण्यात आला आहे. आता चौथ्या वर्षी कुठल्या समाजाला न्याय मिळतो याकडे लक्ष लागून आहे. या पदासाठी मात्र अनेकजण इच्छुक असून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

अशाच प्रकारची संधी स्वीकृत नगरसेवकपदांसाठीदेखील दिली जाते. चार जणांची निवड स्वीकृत पदासाठी केली जाते. त्यानुसार प्रत्येक समाजातील एका व्यक्तीला यापूर्वीच आश्वासन देऊन ठेवलेले आहे. आतार्पयत 12 जणांना स्वीकृत नगरसेवकपदाचा मान मिळाला आहे. आणखी दोन वर्ष पालिकेची मुदत असल्यामुळे आणखी आठ जणांना संधी मिळणार आहे. या वर्षासाठी कुणाची वर्णी लागते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

अनेकांची फिल्डिंग

स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकजण इच्छुक असून काहींनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संपर्क साधून इच्छादेखील व्यक्त केली आहे. एकवर्ष जरी संधी राहिली तरी एकदाचे नगरसेवकपद नावापुढे लागत असल्यामुळे अनेकांच्या मनात त्यासाठीची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे इच्छुकांनी विविध माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अद्यापर्पयत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

लवकरच बैठक घेऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नावे निश्चित करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुणाची या पदावर वर्णी लागते याकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे.