शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार कृषी अवजारांसह सिंचन साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

धुळे : महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे, सिंचन सुविधा साधनांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ...

धुळे : महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे, सिंचन सुविधा साधनांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

सन २०२१ - २२मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - अन्नधान्य पिके व गळीत धान्यअंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - अन्नधान्य पिके व गळीत धान्य कार्यक्रम पुढील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात गहू : सोलापूर, बीड, नागपूर. कडधान्य (हरभरा) : राज्यातील सर्व जिल्हे. भरडधान्य (मका) : नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना. पौष्टिक तृणधान्य : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. गळीत धान्य : सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, चंद्रपूर.

बियाणे वितरण असे

वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास रुपये २५ प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास रुपये १२ प्रतिकिलो, संकरित मका रुपये ९५ प्रतिकिलो व रब्बी ज्वारी बियाण्यास १० वर्षांच्या आतील वाणास रुपये ३० प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास रुपये १५ प्रतिकिलो, करडई बियाण्यासाठी रुपये ४० प्रतिकिलो, गहू बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास रुपये २० प्रतिकिलो, दहा वर्षांवरील वाणास रुपये १० प्रतिकिलो. एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पीक प्रात्यक्षिके

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू - सुधारके व पीक संरक्षण औषधांच्या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार रुपये दोन हजार ते चार हजार रुपये प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून, संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.