शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:23 IST

शिरपूर कृषी बाजार समिती : तब्बल आठ दिवसापासून नंबर लावून ट्रॅक्टर उभे असतांना मका मोजण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते़ मात्र तब्बल आठ दिवसापासून भरड धान्य विक्रीसाठी रांगेत शेतकऱ्यांनी वाहने लावलेली असतांना देखील १५ जुलैपासून अचानक खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांनी शुक्रवारपासून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्याचठिकाणी थांबणार असल्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले़मार्केट आवारातील खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केली जात होती़ मात्र शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक असतांना हजारावर शेतकºयांनी केली, परंतु काही शेतकºयांनी न करता प्रत्यक्ष मोजमाफ केंद्रावर येवून त्यांच्याकडून संबंधित संघाच्या कर्मचाºयाने शेतकºयांचे ७/१२ उतारा गोळा करून प्रत्येकाकडून काही रक्कम घेवून आॅनलाईन नोंदणी करण्यात येईल असे शेतकºयांना सांगण्यात आले होते़ त्यामुळे शेतकºयांनी संबंधित कर्मचाºयावर भरवसा ठेवून ७/१२ उतारा दिला होता़ मात्र त्या कर्मचाºयाने वशिलेबाजी करीत बºयाच शेतकºयांची मोजणी केली़ दरम्यान, मोजणी धिम्यागतीने सुरू होती़कोरोनाचा लॉकडाऊन व जनता कर्फ्युमुळे शेतकºयांना ज्यावेळी खरेदीचा नंबर लागेल त्या आदल्या दिवशी एस़एम़एस़ करून कळविले जात होते़ परंतु त्याचा फायदा घेत संघाच्या कर्मचाºयाने अर्थपूर्ण व्यवहार व वशिलेबाजी करून बºयाच शेतकºयांचा माल खरेदी केला़जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी मोजमाफ केंद्रावर वाहनांसह उभे राहून सुध्दा त्यांचा आजही नंबर लागलेला नाही़ तशातच १५ जुलैपासून खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगून सदरचे वाहने घरी घेवून जाण्याचे सांगण्यात आले़ मात्र शेतकºयांनी मोजमाफ ठिकाणी असलेल्या ३० वाहनांची मोजणी होईल या अपेक्षेने ठाण मांडून बसले आहेत़१७ रोजी या संदर्भातले निवेदन शेतकºयांनी तहसिलदाराना दिले़ त्यात शेतकºयांनी फेडरेशनमध्ये नोंदणी केलेली असतांना मोबाईलवर मॅसेज येवून माल विक्रीस करण्यासाठी मार्केटला आणावा असे कळविण्यात आले़त्यामुळे शेतकºयांनी ६ जुलै रोजी भाड्याचे वाहने करून मका विक्री करण्यासाठी मार्केट आवारात आणला़ त्यानंतर आठवडा उलटूनही माल खरेदी होत नसल्यामुळे संबंधित कर्मचाºयांना भेटल्यावर ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते़ दररोज शेतकरी त्या कर्मचाºयांना भेट होते़ ८ ते १० दिवस होवूनही मका खरेदी करण्यात आलेला नाही़विशेषत: गरजु शेतकºयांनी जेवण सुध्दा तेथेच करीत आहेत़ सध्या पावसाळ्याचे दिवस असतांना शेतीचे अनेक कामे सुरू असतांना ते सोडून या ठिकाणी थांबावे लागत असल्यामुळे तेथे देखील नुकसान सहन करावे लागत आहे़प्रशासनाने नियमानुसार मका खरेदी करावा तसेच संबंधितांचा हलगर्जीपणामुळे इतर होत असलेला खर्चही देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे़ठिय्या आंदोलन सुरुचशुक्रवारी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकºयांनी आपले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सायंकाळीही सुरु ठेवले होते. तसेच जोपर्यंत आमचा मका खरेदी केला जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी यावेळी व्यक्त केला.