शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला डांबून ठेवले

By admin | Updated: February 27, 2017 01:00 IST

साक्री तालुका : कर्नाटकातील मुकादमाविरुद्ध गुन्हा, पैसे परत न केल्याचे कारण

धुळे : ऊसतोडणी कामासाठी दिलेले पैसे परत केले नाही म्हणून साक्री तालुक्यातील पचाळे येथील कामगाराच्या कुटुंबाला कर्नाटकातील मुकादमाने डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी निजामपूर पोलिसात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत शांताराम भिवसन अहिरे (वय ३८, रा़ पचाळे, ता़ साक्री) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यात म्हटले आहे की, सुभानअल्ला रसूलसाहब वाळेकर (रा़ अर्जुनगी, ता़ इन्डी, जि़ बिजापूर, कर्नाटक) या मुकादमाने ऊसतोडणी मजुरी कामासाठी पैसे दिले होते़ चौघांना ठेवले डांबून मात्र घेतलेले पैसे काम करूनदेखील फेड केले नाही, या कारणावरून पत्नी संगीताबाई अहिरे, मुलगा संतोष (वय १५), मुलगी सोनाली (वय १३) व मुलगा गुड्ड्या (वय १०) या चौघांना १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेपासून अर्जुनगी येथील त्याच्या शेतातील पत्र्याच्या घरात डांबून ठेवले. तसेच पैसे परतफेड केले नाही तर चौघांचे बरेवाईट करेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मुकादमाविरुद्ध गुन्हा याप्रकरणी मुकादम सुभानअल्ला वाळेकर याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४४ प्रमाणे शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्ह्यात यापूर्वीही असे प्रकार प्रत्ययास आले असून प्रशासनाने पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.