शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपयशातून घातली यशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:45 IST

आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवादअतुल जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कविद्यार्थी दशेपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होत. शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. भरपूर अभ्यास केला. मात्र दोनवेळा परीक्षा देवूनही पदरी अपयश आले. अपयशामुळे काहींच्या अपमानालाही सामोरे जावे लागले. मात्र प्रयत्न सोडले नाही. तिसºया प्रयत्नात यश मिळाले. कठोर परिश्रम, भरपूर अभ्यास केला तर हमखास यश मिळते असे महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात महिला वर्गात प्रथम आलेल्या अश्विनी सुभाष हिरे (पिंपळनेर) यांनी  सांगितले. या यशाबद्दल ‘त्यांचा लोकमत’शी झालेला संवाद असा-प्रश्न : स्पर्धा परीक्षांकडे कसे वळलात? उत्तर : इयत्ता नववी-दहावीत असतांनाच आपणही पोलीस अधिकारी व्हावे असे मनोमन ठरविले होते.  पिंपळनेर येथे घरी जाण्याचा रस्ता हा पोलीस स्टेशनवरूनच जायाचे. तेथील पोलीस स्टेशनला अधिकारी बघितले की त्यांच्या सारखे बनण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  प्रश्न : यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली? उत्तर : आमचा परिवार सुशिक्षित आहे. वडील सुभाष हिरे  पांटबंधारे विभागात अभियंता आहेत. मामा प्रा. जी.एम. सूर्यवंशी यांनीही यापूर्वी स्पर्धा परीक्षा दिली आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मामा, वडीलांकडून मिळाले. भाऊ महिंद्र हिरे हा देखील पुण्यात असतो. त्यानेही खूप मार्गदर्शन केले. या सर्वांच्या प्रेरणेतून हे यश मिळाले. प्रश्न : आगामी ध्येय कोणत? उत्तर : केवळ यावरच न थांबता, मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशनची अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. याचा उपयोग सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करेल.खचले नाही..पहिल्या प्रयत्नापासून स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर तयारी केली. रोज ९-१० तास अभ्यास केला. मात्र दोन प्रयत्नात अपयश आले. अपयशामुळे काहीच्या अपमानालाही सामोरे जावे लागले.मात्र मी खचले नाही. अपयशातूनच उर्जा मिळाली. जोमाने अभ्यास केला. अखेर तिसºया प्रयत्नात यश मिळाले. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले. केवळ यश मिळाले नाही तर महिला वर्गात राज्यात प्रथम येण्याचा  बहुमान मिळाला. यशात आई-वडील, नातेवाईक, शिक्षक, त्याचबरोबर पुण्यातील क्लासच्या शिक्षकांचे योगदान आहे.मराठीतूनच शिक्षण अश्विनी हिरे यांचे बारावी सायन्सपर्यंत शिक्षक पिंपळनेर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी  पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.घरात आई-वडिल भाऊ-बहिण एवढाच परिवार. मात्र पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद केला नाही.स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, भरपूर अभ्यासाची गरज आहे. नियोजनबद्ध तयारी केल्यास यश मिळते - अश्विनी  हिरे

टॅग्स :Dhuleधुळे