शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ‘अतिवृष्टी’चा १४४६ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:28 IST

महसूल यंत्रणेला पंचनाम्याच्या सूचना

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धुळे व साक्री तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील एकूण २६ गावांमधील सुमारे १ हजार ४४६.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल यंत्रणेला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला ४ व ५ या तारखांना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा सर्वाधिक फटका धुळे तालुका व साक्री तालुक्यातील पिकांना बसलेला आहे.या दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील ९ गावांमधील सुमारे ७६३.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यात धुळे तालुक्यात मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तर साक्री तालुक्यातील १५ गावांमधील ६८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या तालुक्यातही मका व सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.पंचनाम्याच्या सूचनादरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात नुकसान नाहीजिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला असला तरी या अतिवृष्टीमुळे शिंदखेडा व शिरपूर या दोन तालुक्यांमध्ये पिकांचे फारसे नुकसान झालेले नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे