शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विकासात बँकेच्या योगदानाची अपेक्षा - सुभाष भामरे

By admin | Updated: May 28, 2017 13:32 IST

शिखर बँकेच्या धुळे शाखेचे उद्घाटन, बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.28 - शिखर बँकेने धुळ्यात शाखा उघडल्यामुळे ग्रामीण विकासासाठी बँकेच्या योगदानाची अपेक्षा असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, पीककर्ज देण्यास हातभार लावून बँकेने ग्रामीण विकासाला चालना द्यावी़ गेल्या पाच वर्षात बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला असून, ती गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केल़े
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात शिखर बँकेच्या धुळे शाखेचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते झाल़े, त्या वेळी ते बोलत होत़े एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जितेंद्रसिंह रावल, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ़ एम़एल़सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड उपस्थित होत़े या वेळी बोलताना डॉ़ भामरे म्हणाले की, 2011-12 मध्ये रिझव्र्ह बँकेने शिखर बँकेवर प्रशासकीय मंडळ बसविल़े  11 र्निबध बँकेवर घालण्यात आले होत़े मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला़ शिखर बँकेला 104 वर्षाचा इतिहास असून बँकेला अलीकडे विस्ताराची संधी मिळत आहे, ही सर्वासाठी समाधानाची बाब आह़े माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी, शिखर बँकेने शेतक:यांना पीककर्ज देऊन जिल्हा बँकेच्या कामास हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़  जितेंद्रसिंह रावल यांनी बँकेच्या भरभराटीच्या व अडचणीच्या काळाचे आपण साक्षीदार राहिल्याचे मत व्यक्त केल़े  डॉ़ एम़एल सुखदेवे व प्रमोद कर्नाड यांनीही मनोगत व्यक्त केल़े