शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कानुमातेचे उत्साहात विसर्जन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:37 IST

ठिकठिकाणी सामूहिक विसर्जन मिरवणूक : ‘कानुबाई चालनी गंगेवरी व माय..’गीतावर अनेकजण थिरकले, गावात घडले एकोप्याचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेची सोमवारी वाजत-गाजत मिरवणूक काढून ठिकठिकाणी उत्साहात विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीदरम्यान महिलांनी घातलेल्या फुगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर ‘कानुबाई चालनी गंगेवरी व माय चालनी  गंगेवरी’ या गीताने उत्साहात अधिकच भर पडलेली होती. *धुळे*दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसºया रविवारी कानुमातेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. परंतु  यावर्षी दुसºया रविवारी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी रोटांचा नवैद्य चढविणे योग्य ठरणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. तर तिसºया रविवारनंतर पौर्णिमा आहे. त्यामुळे तेव्हाही शक्य होणार नसल्याचे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये  श्रावण महिन्यातील पहिल्याच रविवारी हा सण साजरा करण्यात आला.यावर्षी आतापर्यंत दिलासादायक पाऊस झाला आहे. त्यातच रविवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने, श्रावण महिन्यातील या पहिल्याच सणानिमित्त घरोघरी उत्साहाचे वातावरण होते.रविवारी अनेक ठिकाणी कानुमातेची विधिवत स्थापना करण्यात आली. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला  होता. त्यावरील आकर्षक  रोेषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.  कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप देण्यात आले होते.  त्याला अलंकारानं सजविले  होते. यानंतर  कानुमातेची मत्रोच्चारात पूजा करण्यात आली. ‘रोटां’साठी बाहेर गावी गेलेली मंडळीही गावी परतली होती. तर रात्री अनेकांनी अहिराणी गीते म्हणून जागरण केले. सोमवारी मिरवणूकसोमवारी कानुमातेची वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान महिलांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. दरम्यान यावर्षी पांझरा नदीला मोठा पूर आलेला असून, पुलही पाण्याखाली गेलेले असल्याने, अगदी नदी काठावरूनच कानुमातेचे नदीत विसर्जन करण्यात आले होते.  *कुंडाणे (वरखेडे) *येथे   कानुमातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.     शनिवारी भाजी भाकरीचे रोट  झाल्यानंतर रविवारी सायंकाळी कानुमातेची विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर बोली भाषेतील पारंपारिक गीते म्हणून रात्रभर जागरण करण्यात आले. महिला पुरुषांनी पारंपारिक गीते आणि वाद्यावर फुगड्यांचा  फेर धरला. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास  आरती केल्यानंतर ढोल ताशा, डीजे, सनई, संबळ वर पदन्यास करीत  विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.मिरवणूक मार्गावर प्रत्येक घरोघरी कानूमातेचे पूजन झाले. संपूर्ण गावातील कानुमाता मारुती चौकात आल्यानंतर अनेकांनी तिथे  फुगड्यांचा  फेर धरला.भजनी मंडळांकडून भजने आणि  भारूडाची कार्यक्रम झाले. त्यानंतर  पांझरा पात्रात संपन्नता आणि आरोग्याची आराधना करीत आरती करण्यात आली. नंतर नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. *मालपूर (ता. शिंदखेडा)*येथे कानुमातेची रविवारी उत्साहात स्थापना करण्यात आली होती. सोमवारी कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. मिरणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते.  कानुमातेची स्थापना केल्यानंतर रात्रभर अहिराणी, मराठी गीते म्हणण्यात आली. कानुमातेच्या दर्शनासाठी घरोघरी भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी गावातील शनिमंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. महिलांनी डोक्यावर कानुमातेची मूर्ती घेत मिरवणुकीत सहभागी झाल्या.  ग्रामपंचायत चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवा मारूती चौक, मोठे महादेव मंदिर या मार्गावरून बाबासाहेब घाट उतरत अमरावती नदीपात्रातील संगमेश्वर घाटावर कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण ग्रामस्थ एकत्र आले होते. *निमगुळ (ता.शिंदखेडा) *गावात कानुमातेचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त गावात गेल्या तीन दिवसांपासून उत्साहाचे वातावरण होते. गावात ठिकठिकाणी कानुमातेची गाणी लावण्यात आल्याने वातावरण निर्मिती झाली होती.रविवारी कानुमातेची उत्साहात स्थापना झाली. सोमवारी सकाळी येथील राजवाडा, कुंभारगल्ली, महादेवपूरा, विठ्ठल मंदिर चौक आदी भागातून जवळपास ४१ कानुमातांची मूर्ती  मारूती मंदिराजवळ आणली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक काढून  निरोप देण्यात आला. यावेळी गावात एकीचे दर्शन दिसून आले. *जैताणे (ता. साक्री)*येथे कानुबाईची विधिवत  स्थापना करून आज सोमवारी कानुबाईचे विसर्जन करण्यात आले.    दर वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाई मातेच्या रोट साजरे करण्यात येतात.   भाऊबंदकीतील  सदस्य  या सोहळ्यानिमित्त एकत्र  येत असतात. या उत्सवानिमित्त गावात  उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी कानुमातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दहा वषार्नंतर रोहिणी नदीच्या खळाळत्या प्रवाहात विसर्जन  करण्यात आले. झाले. युवक,महिला,आबालवृद्ध ाद्यवृंदाच्या तालावर थिरकत या मिरवणुकीत सहभागी झाले होते.दरम्यान या उत्सवानिमित्त बाजारपेठेतही चांगली गर्दी दिसून आली होती.*शिरपूरला कानुमातेची अपूर्व उत्साहात काढली मिरवणूक*शिरपूर : येथे कानुबाई उत्सवाची विसर्जन मिरवणूकीमुळे मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलली होती.   श्रावण सरींचा आनंद घेत बँड, डीजे व ढोलताशांच्या तालावर  बच्चे कंपनीपासून तरूणाई-वृध्दापर्यंत सारे जण तल्लीन होवून थिरकत होती़ कानुबाई उत्सावावर आधारीत ‘शिरपुर नगरीले जावू दया़़़’ व ‘डोंगर हिरवा गाऱ़़’ या अहिराणी भाषेतील गाण्यावर सारे भाविक थिरकले़  येथे कानुमातेची रविवारी उत्साहात स्थापन करण्यात आली होती. रोट पुजा कानुबाई पुढे नवविवाहित जोडपे वा कुटुंब प्रमुख पूजा करतात. रात्रभर जागरणासाठी फुगड्या, गाणी आदी कार्यक्रम झाले.  सोमवारी सकाळी ९ वाजेपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत डीजे, ढोलताशे-बँन्डच्या वाद्यावर कानुबाईची विसर्जन मिरवणूक अरूणावती नदीपर्यंत काढण्यात आली.  विसर्जन मिरवणूकीत ‘शिरपुर नगरीले जावू दया़़़’ व ‘डोंगर हिरवा गाऱ़़’ ही गीते गाऊन तरूणाई बेधुंद होवून नाचत होती. तसेच सैराट सिनेमातील गाण्यांवर देखील सारे थिरकलेत़ शहरातील सर्व मार्गावर मिरवणुकांची गर्दी झाली होती.  विशेषत: पांचकंदील चौकात मिरवणुक पाहण्यासाठी शहरवासियांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.  वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी सहकार्य करीत होते.  मात्र दुपारी एकाचवेळी तिनही मार्गाने विसर्जन मिरवणूक पाचकंदिल चौकात आल्याने तोबा गर्दी झाली होती़ त्यामुळे अर्धातासापर्यंत दोन्ही बाजूकडील रहदारी ठप्प झाली़ मिरवणुकीचा समारोप खंडेराव मंदिर जवळील अरूणावती काठावर जल्लोषाने झाला. कानुबाईची पूजा करून पुजेचे साहित्य नदीपात्रात सोडण्यात आले.  ग्रामिण भागातही सकाळपासून कानुबाईची मिरवणुक उत्साहाने काढण्यात आली. थाळनेर येथे ही तापी नदीच्या पात्रात कानुबाईचे विसर्जन करण्यात आले.

 

टॅग्स :Dhuleधुळे