शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

साक्री रोडवरील अतिक्रमण हटणार!

By admin | Updated: January 16, 2017 23:58 IST

अतिक्रमणधारकांना दिलेली मुदत पूर्ण : 400 मीटर चौपदरीकरणाचे काम होणार, उर्वरित कामाचा पाठपुरावा

धुळे : शहरातील साक्री रोडवरील अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून लवकरच सदरचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली. शहरातील या साडेचार कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित असून त्यापैकी 400 मीटरचे काम यापूर्वीच मंजूर झाले आहे. अतिक्रमणधारकांची संख्या मोठी असल्याने वैयक्तिक नोटिसांऐवजी जाहीर नोटीस प्रसिद्धीस दिल्याचे सांगण्यात आले.  15 दिवसांची मुदत पूर्ण शहरातील गुरू-शिष्य स्मारकापासून साक्री रोडवरील हनुमान टेकडीजवळील ‘सर्कल’र्पयतचा रस्त्याचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मोडतो. शहरात हाच रस्ता चौपदरीकरणाचा बाकी असून लवकरच हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या संदर्भात 29  डिसेंबर रोजी जाहीर नोटिसीद्वारे या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना आपापले अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 15 दिवस मुदत देण्यात आली होती. त्यामुळे किमान 15 जानेवारीर्पयत सदरचे अतिक्रमण स्वत:हून काढण्याची अपेक्षा होती. आचारसंहितेचा अडसर नाही राज्य विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे. मात्र अतिक्रमण काढण्यास काही अडसर येणार नाही. महापालिकेने वेळ दिल्यास उद्याही अतिक्रमण काढण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मनपा हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेचीही हद्द आहे. चौपदरीकरणाचे काम करायचे तर या दोन्ही हद्दीत अतिक्रमण नको, अशी भूमिका या विभागाची आहे. विभागाच्या हद्दीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अतिक्रमण आहे. परंतु विभागाची हद्द संपताच सुरू होणा:या महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण आहे. त्यामुळे संयुक्त मोहीम राबवूनच दोन्ही हद्दीतील अतिक्रमण हटविले जाणार आहे. महापालिकेचा कर्मचारी वर्ग केव्हा उपलब्ध होतो, त्यावर ही अतिक्रमण निमरूलन करण्याची कारवाई अवलंबून आहे. 400 मीटरचे काम लवकरच साक्री रोडवरील मोती नाल्यापासून मोहन मेडिकल दुकानार्पयत 400 मीटरचे चोैपदरीकरणाचे काम मंजूर आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताच ते काम सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खुणांवरून समजणार अतिक्रमण या रस्त्यावरील अतिक्रमण पाच वर्षापूर्वी काढण्यात आले होते. त्यावेळी सव्र्हे करण्यात येऊन खुणा गाडण्यात आल्या होत्या. त्या अद्याप कायम असून त्याद्वारेच अतिक्रमण ठरणारे बांधकाम व अन्य साहित्य या अतिक्रमण निमरूलन मोहिमेंतर्गत हटविण्यात येणार आहे. चौपदरीकरणानंतर सदर रस्ता 18 मीटर म्हणजे सुमारे 54 फूट रुंद होणार असून मध्यभागी दुभाजक राहणारा आहे. दोन्ही बाजूच्या गटारांर्पयत हा रस्ता राहणार असून त्यानंतर ‘पेव्हर ब्लॉक’ही बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर अतिक्रमण करणे शक्य होणार नाही. तसेच त्यामुळे रस्ताही खराब होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.