शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी खाली तरी मानधन भारी!

By admin | Updated: July 17, 2017 01:09 IST

७५ नगरसेवकांना मिळणार वाढीव मानधन : मनपावर वार्षिक २२ लाख ५० हजारांचा पडणार भार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यातील सर्व महापालिका सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शनिवारी राज्य सरकारने घेतला़ यामुळे नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी मनपा प्रशासनाची तिजोरी खाली असताना वाढीव मानधन देण्यासाठी वार्षिक २२ लाख ५० हजार रुपयांचा भार मनपावर पडणार आहे़ धुळे महापालिकेच्या ७५ नगरसेवकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे़धुळे महापालिकेचा समावेश ड वर्गात असल्याने पालिकेच्या ७५ नगरसेवकांना दरमहा ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून मनपाची आर्थिक परिस्थिती कमालीची घसरल्याने नगरसेवकांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागते़ असे असतानाच शनिवारी राज्य सरकारने नगरसेवकांना खूष करणारा निर्णय घेतला़महापौर परिषदेतही ठराववाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे सातत्याने झाली आहे़ त्याचप्रमाणे महापौर परिषदेत तसा ठरावही करण्यात आला होता़ दरम्यान, राज्य सरकारने या मागणीची दखल घेत राज्यातील सर्व २६ महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे़मनपावर लाखोंचा भारनगरसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी त्याचा थेट भार महापालिकेवर पडणार आहे़ धुळे महापालिकेच्या ७५ नगरसेवकांना सध्या ७ हजार ५०० रुपये दरमहा मानधन दिले जाते़ त्यासाठी मनपाला आतापर्यंत दरमहा ५ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद, तर वार्षिक ६७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करावी लागत होती़ मात्र मानधनवाढीच्या निर्णयामुळे मनपाला दरमहा ७ लाख ५० हजार रुपयांची, तर वार्षिक तरतूद २३ लाखांनी वाढवून ९० लाख रुपयांची करावी लागणार आहे़ उत्पन्नाचे स्त्रोत हवेतधुळे महापालिकेवर पडणारा भार लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी स्त्रोत शोधण्याचे आव्हान मनपासमोर असेल़ जकात बंद झाल्यापासून मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असून, अत्यावश्यक गरजा भागविणेही मनपाला अवघड जात आहे़ अशा परिस्थितीत झालेल्या मानधनवाढीच्या निर्णयामुळे मनपाला उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर द्यावा लागेल़ सद्य:स्थितीत मनपावर तापी पाणीपुरवठा योजनेच्या कर्जासह जवळपास २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे़ बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विविध योजनांमध्ये मनपा हिस्सा टाकतानाही पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे़ हद्दवाढ झाल्यास भार वाढणारधुळे महापालिकेच्या हद्दवाढीचा अंतिम प्रस्ताव शासनाला सादर असून हद्दवाढ कधीही लागू होऊ शकते़ पुढील वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन तत्पूर्वी हद्दवाढ होण्याची शक्यता आहे. हद्दवाढ झाल्यास संपूर्ण वाढीव क्षेत्रांची प्रभाग रचना होऊन नगरसेवकांची संख्यादेखील वाढू शकते़ त्यामुळे मनपावरील आर्थिक भारही वाढणार आहे़महापालिकेचे ७५ नगरसेवक़़धुळे महापालिकेची सदस्य संख्या स्वीकृत सदस्यांसह ७५ असून राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे़ त्यापैकी ३६ नगरसेवक राष्ट्रवादीचे, ९ नगरसेवक शहर विकास आघाडीचे, ३ नगरसेवक समाजवादी पाटीर्चे, ७ नगरसेवक काँग्रेसचे, ११ नगरसेवक शिवसेनेचे व ३ नगरसेवक भाजपचे, १ नगरसेवक बहुजन समाज पाटीर्चा आणि ५ नगरसेवक स्वीकृत सदस्य आहेत़ त्यांच्या मानधनात प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे़