शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे धुळे जिल्ह्यात प्रादेशिक पाणी योजना डबघाईस

By admin | Updated: May 6, 2017 17:21 IST

3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 6 - धुळे जिल्ह्यात असलेल्या 9 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे 3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़ ग्रामस्थांनी नियमित बिल भरल्यास त्या पुन्हा जोमाने सुरू होतील, असे जि.प.चे म्हणणे आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती पाहता ब:याच ठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत़ त्यातील काही बंद असल्या तरी ज्या सुरू आहेत त्यांच्याकडेसुद्धा वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आह़े  जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात नळपाणीपुरवठा योजनांसह प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत़ धुळे तालुक्यात 141 ग्रामपंचायती असून त्यात 168 गावे आणि 202 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 55 हजार 966 इतकी लोकसंख्या आह़े साक्री तालुक्यात 168 ग्रामपंचायती असून त्यात 229 गावे आणि 517 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 58 हजार 816 इतकी लोकसंख्या आह़े शिरपूर तालुक्यात 118 ग्रामपंचायती असून त्यात 147 गावे आणि 304 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 3 लाख 53 हजार 952 इतकी लोकसंख्या आह़े शिंदखेडा तालुक्यात 123 ग्रामपंचायती असून त्यात 141 गावे आणि 143 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 2 लाख 53 हजार 757 इतकी लोकसंख्या आह़े अशा एकूण जिल्ह्यात 550 ग्रामपंचायती असून त्यात 685 गावे आणि 1 हजार 116 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 15 लाख 22 हजार 491 इतकी लोकसंख्या आह़ेजिल्ह्यात 2 हजार 189 हातपंप आहेत़ त्यापैकी 1 हजार 694 हातपंप बारमाही सुरू आहेत़ असे असले, तरी 495 हातपंप हे कायमस्वरूपी बंद आहेत़ धुळे तालुक्यातही एकही हातपंप हा कायमस्वरूपी बंद नाही़ साक्री तालुक्यात 229, शिरपूर तालुक्यात 168 आणि शिंदखेडा तालुक्यात 98 असे एकूण 495 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत़विशेष म्हणजे योजना आल्या, की त्यांच्याकडील वीज वितरण कंपनीचे बिल हे आलेच़ त्यामुळे त्या-त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडील वीज बिल वेळेवर भरणे आवश्यक आह़े त्यासाठी ग्रामस्थांनीसुद्धा वेळेवर सहकार्य केल्यास कोणत्याही प्रकारची थकबाकी होणार नाही़ योजना या पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, हे स्पष्ट आह़े पण केवळ ग्रामस्थांची उदासीनता असल्याने ही वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे समोर येत आह़े