शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दोंडाईचा बाजार समिती : गुरांच्या बाजारात १५ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:19 IST

दोंडाईचा बाजार समिती : १९ लाख ८७ हजार रुपयांचे समितीला मिळाले घसघशीत उत्पन्न

दोंडाईचा :  येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीत व दुय्यम बाजार समितीत गाय, बैल यांच्यासह २८ हजार ४८२ प्राण्यांची खरेदी-विक्री झाली असून त्यात १५ कोटी ७४ लाख ७३ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीस गेटपास, रजिस्टर फी, बाजार फी यातून १९ लाख ८७ हजार ३०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे .दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती व बेटावद दुय्यम बाजार समितीत बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. येथील गाय बाजार प्रसिद्ध आहे. म्हैस व गाय विक्रीसाठी राजस्थान, गुजरात आदी राज्यातील व्यापारी येथे निवासी आहेत. बाजार समितीत  २०१८-१९  या आर्थिक वर्षात पाच हजार १३२ बैलांची आवक झाली असून एक हजार १४१ खरेदी -विक्री झाली. त्यात एक कोटी ६८ लाख ५५ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली. बाजार समितीत गायींची चार हजार ६२३ आवक झाली असून तीन हजार ८५४ गायींची खरेदी-विक्री झाली. त्यात आठ कोटी ३८ लाख ७०० रुपयांची उलाढाल झाली. म्हशींची आवक एक हजार २४३ झाली असून त्यात एक हजार म्हशींची खरेदी-विक्री झाली. त्यात दोन कोटी ९१ लाख ६० हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.बाजार समितीत सर्वाधिक  खरेदी-विक्री होते शेळींची. यात शेळ्यांची २९ हजार ३६४ आवक झाली असून खरेदी-विक्री  २२ हजार २१८ इतकी झाली आहे. त्यात दोन कोटी ६७ लाख आठ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली. बाजार समितीत ६३० मेंढ्यांची आवक झाली असून २२४ मेंढ्यांची खरेदी-विक्री झाली. त्यात दोन लाख १७ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली. 

आर्थिक वर्षात ४० हजार ८७२ विविध प्राण्यांची आवकबाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षात विविध प्राण्यांची ४० हजार ८७२ एवढी आवक झाली असून २८ हजार ४८२ गुरांची खरेदीविक्री झाली. त्यात १५ कोटी ७४ लाख ७३ हजार १०० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. बाजार समीतीला गेटपास फी, रजिस्टर फी, बाजार फी व सुपर्व्हिजन कास्ट फी असे ऐकूण १९ लाख ८७ हजार ३०१ रुपयांचे आर्थिक उत्पन्न  मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Dhuleधुळे