शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांनी ४८ हरकती फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST

जिल्हा परिषद प्रभाग रचना : केवळ एकच हरकत मान्य केली

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडे ४९ हरकती प्राप्त झाल्या होत्याविभागीय आयुक्तांकडे सुनावणीचा निकाल जाहीरकेवळ एक हरकतच मान्य केली

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त ४९ हरकतींवर ८ मे रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. यापैकी ४८ हरकती अमान्य करण्यात आली. तर केवळ एकच हरकत मान्य करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाचे कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची रचना व एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच स्त्रियांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसह राखून ठेवलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण दर्शविणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्द केला होता.त्यावर हरकत, सूचना मांडण्यासाठी ६ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुदतीअखेर एकूण २० हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर निवडणूक कार्यक्रमास स्थगिती मिळण्यापूर्वी २९ हरकती प्राप्त झालेल्या होत्या.त्यामुळे या २९ व आताच्या २० हरकती अशा एकूण ४९ हरकतींवर ८ मे रोजी नाशिक विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. सुनावणीनंतर आयुक्तांनी निर्णय राखून ठेवला होता. या हरकतींवरील निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार ४९ पैकी ४८ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. तर एक हरकत मान्य करण्यात आली आहे. मान्य केलेली हरकत ही शिरपूर तालुक्यातील आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसख्या अधिक आहे, त्या गावाचे नाव गणास द्यावे, अशी सूचना या हरकतीत नमुद होती. ही हरकत मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या ग्रामपंचायतीचे नाव त्या गणास दिले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :Dhuleधुळे