राज्य शासन या निवडणुका होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे. शासनाचा अथवा न्यायालयाचा निर्णय आपणास अंतिम असून जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आपण सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहावे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले व कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांचा पक्ष पातळीवरील निर्णय आपणा सर्वांना अंतिम राहील.
यावेळी कोराेना काळातील आपले जवळचे मित्र, कार्यकर्ते, नातेवाईक मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिंदखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील, सेवादलाचे अध्यक्ष विशाल पाटील, खलाणेचे सरपंच शाम भिल, बाबल्याचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, मालपूरचे हेमराज पाटील, वीरेंद्र झालसे, रतिलाल पाटील, मेथीचे भैय्या चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, शामकांत पाटील, माधव बडगुजर, भाईदास निळे, जितेंद्र सिसोदे, पंढरीनाथ सिसोदे, डॉ. जयवंतराव बोरसे, लोटन माळी, शिंदखेडा नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, डॉक्टर प्रशांत बागुल, उमेश पवार, मनोज मोरे,रशिद कुरेशी किशोर पवार विनायक पाटील बाबुराव पाटील बापू पाटी मोरे, संजय माळी, महेंद्र देवरे, माधव देवरे, कैलास आखाडे, विलास गोसावी उपस्थित होते.