शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

कापडणेसह परिसरातील शेतक:यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला आदी पीक लागवडीला फाटा दिला आहे.

कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरातील शेतक:यांनी  रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला आदी पीक लागवडीला फाटा दिला आहे.  सद्य:स्थितीत या भागात भारनियमन सुरू आहे. परिणामी, येथील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असून भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पांढ:या कांद्याच्या लागवडीवर शेतक:यांचा यंदा अधिक कल दिसला.भारनियमनाचा त्रासमहावितरण कंपनीतर्फे कापडणेसह परिसरात आता भारनियमन सुरू झाले आहे. एका आठवडय़ात सकाळी 10 ते सायंकाळी 8 तर दुस:या आठवडय़ात संपूर्ण दिवसभर वीज बंद असते. त्यामुळे दिवसभर वीज बंद असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. कृषी पंपही बंद भारनियमनामुळे बंद असतात. त्यामुळे कापडणे भागात सुरू असलेले भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. कापडणे येथील 1200 ते 1500 एकर जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते. खरीप हंगामातही येथील शेतक:यांनी मोठय़ा आशेने कांदा लागवड केली होती. परंतु, त्यांना हाती तुटपुंजे पैसे मिळाले होते. यंदा परिसरातील जयवंत यशवंत बोरसे, संभाजी रघुनाथ बोरसे, शिवाजी शंकर बोरसे, भीमराव महादू बोरसे, देवीदास गंगाराम खलाणे, अरुण पुंडलिक पाटील, अरुण परशुराम पाटील, विजय हिंमत पाटील, विश्वास आत्माराम देसले, सुरेश भीमराव बोरसे, उज्ज्वल बोरसे, नथ्थू जयराम माळी, राजेंद्र रमेश माळी, विलास आसाराम माळी यांच्यासह काही शेतक:यांनी मोठय़ा हिंमतीने पुन्हा कांदा लागवडीस प्रारंभ केला आहे.  त्यात येथील परिसरात सद्य:स्थितीत विहिरी व कूपनलिकांचे पाणी दिवसेंदिवस तळ गाठत आहे, त्यात शेतक:यांनी कांदा लागवडीचा जो निर्णय घेतला, तो किती योग्य आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे.पांढ:या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर गेल्या वर्षी रांगडा कांद्यापेक्षा सफेद कांद्याच्या उत्पादनातून येथील शेतक:यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे शेतक:यांनी पुन्हा कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादनातून आता चांगले उत्पादन मिळाले तर पुढे येणा:या खरीप हंगामात शेतक:यांना फायदा होणार आहे, या विचाराने शेतक:यांनी कांदा लागवड केली आहे.  कांद्याने रडवले होते गेल्या हंगामात येथील शेतक:यांनी रांगडा कांद्याची लागवड मोठय़ाप्रमाणावर केली होती. त्यासाठी सावकार, पतपेढय़ा, वि.का. सोसायटय़ा व इतर बॅँकांतून कर्ज काढले होते. परंतु, कांद्याला केवळ 5 ते 10 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळाल्याने शेतक:यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु, चाळीतील कांदाही सडून गेला. त्यामुळे शेतक:यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर यंदा शेतक:यांनी पांढ:या कांद्याची लागवड केली आहे.