शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

गळती रोखण्यात धुळे महापालिका अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:49 IST

लाख मोलाचे पाणी मातीमोल : प्रभावी उपाययोजना करुन गळती रोखण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लाखमोलाचे पाणी अक्षरश: मातीमोल होत आहे़ टंचाईचा काळ सुरु होण्यापुर्वीच त्या रोखण्याची नितांत आवश्यकता आहे़ मात्र, या गळत्या रोखण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र शहरातील ठिकठिकाणी प्रभावीपणे उमटत असल्याचे सर्वश्रृत आहे़ कुठेही उपाययोजना होताना दिसत नाही़ धुळेकरांना तापी पाणी पुरवठा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी वितरीत केले जाते़ आजच्या स्थितीत बहुसंख्य भागात ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ त्याचे नियोजन पुरेशा प्रमाणात होत नसताना पाण्याची पाईप लाईन अथवा व्हॉल्व गळतीतून पाणी वाया जात असताना ते रोखू शकत नसल्याचे दुर्दैव आहे़ महापालिकेच्या दरवर्षाच्या अर्थसंकल्पात गळतीच्या कामांसाठी लाखों रुपयांची तरतूद केलेली असते़ असे असूनही दुरुस्तीचे काम कायमस्वरुपी का होत नाही? असा प्रश्नच आहे़ आजवर झालेल्या महासभा, स्थायी समितीच्या बैठकांमधून वेळोवेळी हा प्रश्न सदस्यांनी अगदी आक्रमकपणे मांडला आहे़ मात्र, तेवढ्यापुरता त्यावर लक्ष दिले जाते़ ठोस उपाययोजना केली जात नाही़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाईप लाईन गळतीच्या कामांसाठी लाखो रुपयांची तरतूद केलेली असते़ त्यासाठी निधी देखील मिळतो़ असे असूनही गळती कायमची रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही़ फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक आहेत़ आत्तापासूनच शहरातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे़ पाणी गळती ज्या ठिकाणी आहे ती आजच तयार झाली असे नसून खूप दिवसांपासून या गळत्या कायम आहे़ पांझरा नदीतून पाण्याचा पाईप गेला़ त्या ठिकाणी गळती असल्याने पाणी थेट पांझरेत वाहत आहे़

टॅग्स :DhuleधुळेCorruptionभ्रष्टाचार