शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे - नरडाणा दरम्यान भूमिअधिग्रहणाच्या काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:27 IST

मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्ग : पहिल्या टप्यात धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे काम नवीन वर्षात मार्गी लागणार

राजेंद्र शर्मा ।धुळे : मनमाड -धुळे - इंदूर रेल्वेमार्गाचे लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात रेल्वेमार्गाचे मनमाड - धुळे - इंदूर दरम्यान सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या टप्यात धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामासाठी प्रत्यक्ष भूमीअधिग्रहणास सुरुवात देखील झाली आहे. परंतू विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाची गती कमी झाली होती. आता पुन्हा कामाने गती घेतली असून पुढच्या वर्षात हे लवकरातलवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.पश्चिम रेल्वे मुंबईच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या सर्व्हे अंतर्गत मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गात येणाऱ्या क्षेत्रातील भूमिअधिग्रहण करण्यासाठी सर्व्हे कंपनीने मैलाचे दगड लावून सर्व्हे सुरु केला आहे. यासाठी प्रस्तावित रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दगडांच्या खुणा लावण्यात येत आहे. मैलाचे दगड लावण्याचे काम मनमाडपासून सुरु झाले ते आता मध्यप्रदेशातील मानपूर पर्यंत पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गाअंतर्गत पहिल्या टप्यात धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाच्या काम होणार असून त्यासाठी भूमिअधिग्रहणाच्या काम सुरु झाले आहे.मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा ३३९ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. यापैकी महाराष्ट्रात १९२ तर मध्यप्रदेशात १४७ किलोमीटर अंतर राहणार आहे. सातपुडा पर्वतरांगा असल्याने या मार्गावर दोन बोगद्यांचा देखील समावेश आहे़ ३३९ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर इंदूर ते बंदरगाह ट्रस्टपर्यंतचे अंतर १५० किलोमीटरने कमी होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे मनमाड, मालेगाव, धुळ्यासह मध्यप्रदेशातील खंडवा, बुºहानपूर, खरगोन, बडवानी जिल्ह्यात औद्योगिक विकास होईल.पहिल्या टप्यातील धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी रेल्वे अ‍ॅण्ड पोर्ट कार्पोरेशनच्या माध्यमातून भूमिअधिग्रहीत करण्यात येत आहे. या कामाअंतर्गत भूमिअधिग्रहणासाठी धुळे तालुक्यातील बोरविहीर ते कापडणे दरम्यान खुणा लावण्यात आलेल्या आहेत. लवकरच नरडाणा पर्यंत खुणा लावून तिथपर्यंतची भूमिअधिग्रहीत करण्यात येणार आहे. कामास सुरुवात झाली असून त्याला आता वेग आला आहे. नवीन वर्षात हे काम पूर्ण होईल.

टॅग्स :Dhuleधुळे