लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. ही कारवाई गुरूवारी रात्री आर्वी-मोघण रस्त्यावर करण्यात आली. लाकडासह ट्रक जप्त केला असून, त्याची एकत्रित किंमत सुमारे ४ लाख १० हजार रूपये आहे.आर्वीकडून मालेगावकडे ट्रकमधून अवैधरित्या लाकडाची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने आर्वी-मोघण रस्त्यावर गस्त घालीत असतांना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (क्र.एमएच ३९-सी ६०५) दिसला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात अनघड, नीम जातीचे लाकूड आढळून आले. चालकाजवळ लाकूड वाहतुकीचे कागदपत्रे नव्हती. या कारवाईत लाकूड व वाहन असा एकूण ४ लाख १० हजाराचा माल वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे.ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल बी.एस. भामरे, वनरक्षक सी.एस.कचवे, बी.बी.पाटील, व्ही.डी.कांबळे, के.वाय. आखाडे यांच्या पथकाने केली.
धुळे वनविभागाने लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:52 IST
आर्वी-मोराणे रस्त्यावर कारवाई, ४ लाख १० हजाराचा ऐवज जप्त
धुळे वनविभागाने लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
ठळक मुद्देगुप्त माहितीवरून केली कारवाईट्रकसह लाकूड घेतले ताब्यात कारवाईमुळे खळबळ