आॅनलाइन लोकमतधुळे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू झालेली आहे. २०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन आवंटन मंजूर झाले असून, २९ हजार ८५२ मेट्रीक टन साठा शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ४३ हजार ७७२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी ३२ हजार २०० मेट्रीक टन खत जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहे.२०१९-२० या वर्षासाठी खरीपाची २ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन आहे.खरीप हंगामा सुरू होण्यास अजुन काही कालावधी बाकी असला तरी ऐन हंगामात खतांची टंचाई नको म्हणून कृषी विभागातर्फे खतांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार खतांच्या आवंटनाची मागणी करण्यात करण्यात येत असते.२०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. यात युरिया ५१ हजार मेट्रीक टन, डी.ए.पी. ३८००, एसएस.पी.१६ हजार ८००, एम.ओपी ६८००, मिश्र खते ३५ हजार ५०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. गेल्या वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी १ लाख ४३ हजार ७५२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध होणार आहे.
धुळे जिल्ह्याला खरिपासाठी दीड लाख मेट्रीकटन खते मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:23 IST
खताची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा
धुळे जिल्ह्याला खरिपासाठी दीड लाख मेट्रीकटन खते मिळणार
ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख हेक्टरवर होणार खरिपाची लागवड प्रस्तावितजिल्ह्यासाठी खतांचे आवंटन मंजूरगेल्यावर्षापेक्षा जास्त खतांचा पुरवठा होणार