शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्याच्या राजकारणालाही मिळतोय तरूण चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:34 IST

अपेक्षा वाढल्या : अनेक तरूणांना घरातूनच मिळाले राजकारणाचे बाळकडू, ग्रामीण भागातूनही सहभाग वाढतोय

अतुल जोशी।धुळे : साक्री जगात भारत हा देश तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज २१ व्या शतकात कला, क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्र तरूणांनीच व्यापलेले आहेत. त्याला राजकारणही अपवाद राहिलेले नाही. राजकारणातही युवा पिढी सक्रीय झालेली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्वच पक्षांमध्ये तरूण सक्रीय झालेले आहेत. भविष्यात याच तरूणांकडून जिल्ह्यालाही अनेक अपेक्षा आहेत.धुळे जिल्ह्याला राजकारणाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला आहे. त्यात रंगराव माधवराव पाटील, द.वा. पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव रणधीर, माजी मंत्री रोहीदास चुडामण पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शालिनी बोरसे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी वकृत्व व कर्तृत्वाच्या जोरावर राजकारण व्यापून टाकले होते. धुळे जिल्ह्याचे नाव काढल्यावर या नेत्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. मात्र काळ बदलला...यापैकी अनेक नेते राजकारणातून निवृत्त झाले. यापैकी काही नेत्यांचे मुले आता राजकारणात प्रवेशित झालेली आहेत. काही सक्रीय आहेत, तर काही पडद्यामागूनच राजकारणाची सूत्रे हलवित असून या युवा नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या

टॅग्स :Dhuleधुळे