शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर पोलिसांचे हात रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 21:58 IST

यशवंत नगरातील घरफोडी : तपासाचे धागेदोरे नसल्याने अडचणी

धुळे : साक्री रोडवरील यशवंत नगरात झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे शहर पोलिसांच्या हाती लागलेले नाही़ परिणामी शोध कामात मोठ्या प्रमाणावर अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तरीदेखील चोरट्यापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले़साक्री रोडवरील यशवंत नगरातील गुरुनानक मंदिराजवळ राहणाऱ्या जयश्री शंकर महाले या महिलेने फिर्याद दाखल केली़ जयश्री यांचा भाऊ हंसराज शंकर महाले यांचे निधन झाल्याने त्या आकाशवाणी केंद्राजवळील ओमनगरात राहणाºया त्यांच्या भावाच्या घरी गेल्या होत्या़ भावाकडील सर्व कार्यक्रम आटोपून त्या आपल्या घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजाचा उघडा दिसला. संसारोपपयोगी साहित्य अस्ताव्यस्त फेकलेल्या अवस्थेत होते़ त्यांच्या घरातून २ लाख ६७ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने लांबविला असल्याचे समोर आले आहे़शहर पोलिसात घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ यशवंत नगरात चोरी झालेले घर भरवस्तीत असून याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही़ घराच्या लोखंडी दाराला कुलूप लावले होते़ कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिसून आली नाही़ श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ यांनाही बोलाविण्यात आले होते़ परंतु त्यांच्यामार्फत अशी ठोस दिशा मिळू शकलेली नाही़ परिणामी ही घरफोडी घटनेतील चोरट्यांना शोधण्यासाठी शहर पोलिसांना आता कंबर कसावी लागावी लागणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे